दुचाकी चालकांच्या स्टंटबाजीने नागरिक त्रस्त | कर्जत शहरात स्टंटबाजी करत मुली, महिलांच्या छेडछाडीत वाढ

कर्जत -(सुभाष माळवे)

नवीन दुचाकी गाडी घेतली की आर.टी.ओ. कार्यालयात पासिंग केली जाते. गाडी घरी घेऊन आल्त्यायानंतर गाडीच्या नंबरप्लेटची छेडछाड वेगवेगळी लायटिंग करणे, कर्णकर्कश हॉर्न बसविले जात आहेत. शहरात स्टंटबाजी करत मोठ्याने हॉर्न वाजवत दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कर्णकर्कश हॉर्नमुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना कानठळ्या बसत आहेत. लहान मुलांच्या कानाला इजा होत आहे.

पोलिस प्रशासनाने व वाहतूक शाखेने गांभीयनि घेऊन अशा दुचाकींची पाहणी करावी. कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सरचा ठोका वाजविणाऱ्या स्टंटबाजी दुचाकीचालकांवर दंडात्मक व योग्य कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.
शहरात तरुण मंडळी विविध कंपनींच्या दुचाकी व बुलेट गाड्या शोरूममधून बाहेर काढली की पासिंग होईपर्यंत शांत बसतात. त्यानंतर गाडीशी छेडछाड करून गाडीचा चेहरामोहरा बदलून टाकत आहेत.

गाडीच्या छेडछाडीची सुरुवात गाडीच्या नंबरप्लेटपासून केली जाते. ■ कंपनीचे सायलेन्सर व हॉर्न बदलले जातात. लुकलुकणारी लायटिंग चारचाकीसारखे मोठे फोक्स बसवले जातात. हौशी फटफटीस्वार फटफटीचा आवाज मोठा येण्यासाठी सायलेन्सरमध्ये विविध बदल करत ठोका देणाऱ्या सायलेन्सरचा वापर करत आहेत. चारचाकी वाहनांचे हॉर्न बसवून शाळा, कॉलेज, शिकवणी परिसर, मुख्य रस्ता, बसस्थानक, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी कर्णकर्कश्य असे आवाज करत सुसाट वेगाने स्टंटबाजी करत आहेत. कर्णकर्कश हॉर्नमुळे वयोवृद्ध नागरिकांच्या कानठळ्या तर लहान मुलांच्या कानाला इजा पोहोचत आहे.

त्रासदायक स्टंटबाजी करत दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. याला वेळीच आवर घालण्याची आता गरज आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी
गांभीयनि दखल नाही घेतली तर शहरवासीय नागरिकांना बहिरेपणा येऊ शकतो, अशी भीती जागृत नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

  • हिरो बनण्याचा अट्टाहास

शाळा, कॉलेज, क्लासेस सुटले की, मुलींच्या घोळक्याजवळ किंवा महिला पाहताच कट मारणे, दुचाकी वेडीवाकडी चालवत हॉर्नचा आवाज करणे, कर्कश्य आवाज करत सुसाट सुटत आहेत. रस्त्यावरच्या नागरिकांनी जाब विचारला तर ते त्यांच्यासमोर हुज्जत घालत मुली, महिलांसमोर हिरो बनत आहेत. त्यामुळे रस्त्यावरच्या नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. याचा बंदोबस्त पोलीस करणार आहेत की नाही. कर्जत चे पोलीस निरीक्षक ठणकावून सांगत होते असले प्रकार चालणार नाहीत पण उलट चित्र पाहिला मिळते आहे. तरी त्वरित आळा घालण्यासाठी पोलीसांनी पावले उचलली पाहिजेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!