मेहकर (उध्दव फंगाळ)
लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत त्या दृष्टीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध राजकीय पक्षाकडून हालचाली सुरू झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी एकत्र आले आहेत याच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातही राजकीय वातावरण हळूहळू तापत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्यमान खासदार व मेहकर मतदार संघासह बुलढाणा जिल्ह्यात आपली पकड असलेले खासदार प्रतापराव जाधव हे सुद्धा पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांचे हिताचे आंदोलन घेऊन गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत.
तर या लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा कंबर कसली आहे त्याचबरोबर शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात दोन गट पडल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी सुद्धा तयारी केली असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण पाहता महाराष्ट्रातील मतदार राजा मात्र कमालीचा संभ्रमात आहे नेमके मतदान कोणत्या पक्षाला करावे हेच मतदारांना कळत नाही आमदार खासदार एकमेकांच्या पक्षावर आरोप प्रत्यारोप करून सत्तेमध्ये जाऊन बसले आहेत तर जे विरोधामध्ये आहेत ते सुद्धा सध्या संभ्रमातच दिसत आहेत.
भाजपाने महाराष्ट्रात अगदी नियोजन पद्धतीने राष्ट्रवादी व शिवसेना फोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे मात्र हे सर्व करत असताना भाजपाने सुज्ञ व विश्वास पात्र असलेल्या मतदार राजाचा विचार केलेला दिसत नाही कारण कोणताही व्यक्ती फक्त महाराष्ट्राचा विकास व्हावा आपल्या भागातला विकासात्मक कायापालट व्हावा महाराष्ट्रातील सरकार स्थिर राहावे यासाठी मतदान करत असतात मात्र अलीकडच्या काळातील राजकारणाच्या घडामोडी पाहता मतदार राजा कमालीचा संभ्रमात आहेत तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत.
या दृष्टीने सर्वच पक्षांनी राजकीय हालचाली सुरू केल्यात आहेत याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातही लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी घेत असून सध्या तरी प्रत्येक गावात विकासाचा बँडबाजा वाजवताना दिसत आहेत सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चित्र व हालचाल पाहता विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सुद्धा मोठ्या जिद्दीने कामाला लागले आहेत खासदार प्रतापराव जाधव यांची मेहकर मतदार संघात सह बुलढाणा जिल्ह्यात चांगली पकड आहे प्रत्येक गावात त्यांचा कार्यकर्ता व मतदार वर्ग आहे.
तर दुसऱ्या बाजूने शिवसेनेचा दुसरा गट असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असून गेल्या काही महिन्यापासून त्यांनी सुद्धा निवडणूक लढविण्यासाठी हालचाल सुरू केली आहे तर सदैव जनहितासाठी व शेतकऱ्यांसाठी उग्र स्वरूपाचे आंदोलन करून सरकारला धारेवर धरून आपल्या मागण्या मंजूर करून घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रविकांत तुपकर यांचा कार्यकर्ता बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावात आहे मोठा मतदार वर्ग त्यांना ओळखणार आहे.
गेल्या काही वर्षापासून रविकांत तुपकर हे त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून चांगलेच चर्चेमध्ये आले आहे रविकांत तुपकर यांचे आंदोलन म्हटले की सरकारची चांगलीच धांदल उडताना दिसते दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत सध्याचे चित्र पाहता विद्यमान खासदार प्रतापराव जाधव शेतकरी नेते रविकांत तुपकर व उबाठा गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे