उरण युवा-महोत्सवात रंगला..राज्यस्तरीय काव्य-महोत्सव !!”

नवी मुंबई (सुचित्रा कुंचमवार)

उरण- द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन युवा महोत्सव २०२३. आयोजित- राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन- मा.अध्यक्ष श्री. महादेव घरत, संमेलन प्रमुख मा. कविश्री- अरूण द. म्हात्रे आणि कार्यकारिणी यांच्या संगनमताने बोकड वीरा एन्. एम्. एस्. ई. झेड. मैदानात दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले. सुरुवातीस संमेलनाध्यक्ष सर्वेसर्वा श्री. महादेव घरत. उद्घाटक- सौ. वैशालीताई घरत. आणि प्रमुख पाहुणे- मिलिंद खारपाटील, कैलास पिंगळे, म. वा. म्हात्रे, डॉ. स्वरांजली गायकवाड, संग्राम तोगरे आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.

कविश्री अरुण द. म्हात्रे. यांनी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. तसेच उपस्थित असलेल्या सर्व कवी/कवयित्रींचा नामोल्लेख करून शब्दसुमनांनी स्वागत केले. प्रास्ताविक आणि मनोगतात मा. अध्यक्ष श्री. महादेव घरत. यांनी कवी संमेलन प्रमुख- कविश्री: अरूण द. म्हात्रे. यांच्यासह निवेदक/संयोजक कवी-कवयित्री- श्री. संजय होळकर ; भ. पो. म्हात्रे ; चेतन पाटील ; सौ.- सुचित्रा कुंचमवार ; मिनल माळी ; आणि प्रज्ञा म्हात्रे. या सर्वांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. त्याचबरोबर युवा महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांची आखणी आणि माहिती दिली.

विशेष योगायोग म्हणजे संमेलनाच्या उद्घाटक आणि महिला संघटक प्रमुख- सौ. वैशालीताई महादेव घरत. यांचा याच दिवशी असलेल्या जन्मदिनी सर्व महिला/पुरुष कार्यकर्त्यांनी, उपस्थित मान्यवरांनी आणि सारस्वतांनी वैशालीताई ना शुभेच्छा दिल्या. केक कापण्यात आला. कवी/गायक- श्री. अरुण द. म्हात्रे. यांच्या “बार बार दिन ये आये…” या सुष्राव्य गीत गायनाने वातावरण संगीतमय झाले. त्यानंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली.

सदर राज्यस्तरीय कवी संमेलनाला राज्याच्या विविध भागांतून अनेक मान्यवर कवी/कवयित्रींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यात ७५-८० वर्षा चे वृद्ध महिला/पुरुष सुद्धा होते. एकूण ५० सारस्वतांनी आपल्या विविध विषयांच्या आशय संपन्न बहारदार रचना सादर केल्या. त्यामुळे हे संमेलन “काव्य-सुमनांनी” फुलले. सर्व संयोजक/निवेदकांनी मोजक्या परंतु योग्य शब्दांत सुंदर निवेदन केले. प्रत्येक कवी/कवयत्रीस सादरीकरणानंतर लगेच मान्यवरांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रुपये २००/- देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांनी आपल्या मनोगतात- संमेलनाला उपस्थित राहिल्यामुळे कवी-कवयित्रींच्या सुंदर काव्यरचना ऐकून विशेष आनंद मिळाल्याचे सांगून सुबद्ध नियोजनाचे कौतुक केले. शेवटी श्री. संजय होळकर यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित सर्व मा. सारस्वतांचे सुंदर शब्दांत आभार मानले. संमेलन प्रमुख अरुण द. म्हात्रे यांच्या समवेत मीनल माळी आणि सर्वांनी सुस्वरात पसायदान सादर केले. अशाप्रकारे सुनियोजनाने, आणि आनंददायी तसेच खेळीमेळीच्या वातावरणात सदर राज्यस्तरीय कवी संमेलनाची सांगता झाली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!