यवतमाळ/महागाव:-(सदानंद जाधव)
मागील दोन-तीन महिन्यापासून महागाव तालुक्यात जुगार या अवैध्य धंदाना उत आला आहे भर दिवसा खुलेआम जुगार अड्डा हे कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता खुलेआम सुरू आहेत असे असतांना देखील पोलिस प्रशासन मात्र धिम आहे. जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू असल्याचे बोलल्या जात आहे या सर्व अवैध धंदयावाल्याना मोकळी सुट देऊन त्यांचेकडून मिळत असलेल्या मलीदयामुळेच अवैध्य धंदा चालकांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याचे महागाव तालुक्यातील नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
जुगार मुळे अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर येत असुन उध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे कमी वेळेत जास्त पैसे कमविन्याच्या अमीषात अनेक तरुण मुले व शेतकरी अवैध्य जुगारावर पैसे लाउन आपले भविष्य व पैसा बरबाद करीत आहेत त्यामुळे पोलिस प्रशासनांनी सदर विषयाकडे तातडीने लक्ष वेधले तर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होन्याचे थांबेल अशी देखील चर्चा आहे.
खुलेआम जुगार चालु असून त्यामुळे या परिसरात शांतता, सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता
खुलेआम जुगार चालु असून त्यामुळे या परिसरात शांतता, सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. घराघरात भांडण तंटे निर्माण होत असून जुगार असाच चालू राहिला तर परिसरात चोऱ्याचेही प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे गोरगरीब व शेतकऱ्यांचीही लूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.