मंठा (डॉ आशिष तिवारी)
शहरातील वार्ड क्रमांक पाच मधील कर्तव्यदक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक दीपक आसाराम बोराडे यांनी वार्डातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, आयुष्मान भारत (आभा) कार्ड वाटप कॅम्पचे आयोजन करण्यात आले, वार्डातील नागरिकांना शासकीय योजनेतील वैद्यकिय सेवेचा मोफत लाभ मिळावा व भविष्यात दवाखाना खर्चात पाच लाख रुपये, आभा कार्ड मार्फत असलेली सवलत मिळावी, या उद्देशाने दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा व शिबिरास येताना स्वतःचे आधार कार्ड घेऊन यावे, आणि आयुष्मान भारत कार्ड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक दीपक बोराडे यांनी केले आहे. शिबिर उद्घाटन प्रसंगी वार्ड क्रमांक 10 चे लोकप्रिय नगरसेवक सचिन बोराडे, नगरसेवक दीपक बोराडे, दिनेश अंभोरे, सुनील ठोंबरे, सुनील बोराडे, विशाल सांगोळे, ओम खरात, नरेश सांगोळे, आदित्य चव्हाण, सुरेश गोरे, युवराज राठोड, विशाल ईरचे, गोविंद घनवट, आशा सेविका सुलोचना वाघमारे, मीना गोंडगे, अनिता प्रधान, संदीप प्रधान, ईश्वर आघम, प्रदीप खंदारे, यांच्यासह वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.