यशवंत सेनेमध्ये काम करणाऱ्या इच्छुकांनी संपर्क करा | गजानन बोरकर धनंजय रौंदळे व गणेश आटोळे यांचे आवाहन

मेहकर (उध्दव फंगाळ)

सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संघटन हे आवश्यक झाले आहे वेगवेगळे समाज वेगवेगळ्या संघटना ह्या एकत्रित होत आहेत आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी व शासनाला व प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे यासाठी बुलढाणा जिल्ह्यात यशवंत सेनेचे कामकाज प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावामध्ये वाढवायचे आहे त्या दृष्टीने ज्या इच्छुक महिला पुरुष यांना व युवकांना यशवंत सेनेमध्ये काम करायचे असेल अशा इच्छुकांनी यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख गजानन बोरकर बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय रौंदळे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेश आटोळे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये धनगर समाज लोकसंख्येच्या तुलनेत दोन नंबर वर येत आहे मात्र सध्याच्या राजकारणात धनगर समाजाचे पाहिजे त्या प्रमाणात खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य दिसून येत नाहीत इतर राजकीय पक्ष फक्त धनगर समाजाचा मतदानापुरताच वापर करत असल्याचे चित्र अनेक वर्षापासून दिसून येत आहे मात्र अलीकडच्या काही काळात धनगर समाज सुद्धा जागृत होताना दिसत आहे.

मात्र धनगर समाजामध्ये संघटन नसल्यामुळे व एकजूट नसल्यामुळे इतर राजकीय पक्ष धनगर समाजाचा फायदा घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे यापुढे धनगर समाज बांधवांनी सुद्धा विविध निवडणुकीत आपापले उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करावेत संघटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी समाज मात्र एकच आहे राजकीय काम किंवा सामाजिक काम करत असताना जे इतर समाजाचे लोक आपल्या सोबत येण्यास इच्छुक असतील अशा लोकांना सुद्धा आपण सहभागी करून घेण्याची गरज आहे कारण आपल्याला लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे.

न्याय मिळवून देत असताना समाजकारण अडचणीचे ठरू नये त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाज बांधवांचे एकत्रीकरण किंवा संघटन मजबूत करण्यासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष व इतर कार्यकारणी तयार करायची आहे त्यामुळे इच्छुकांनी वरील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!