माहूर (अमजद खान)
माहूर गडावरिल श्री दत्तशिखर संस्थान येथे आज दिनांक 25 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दत्तनामाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा मोठया उत्साहात पार पडला.श्री दत्तशिखर संस्थान आनंद दत्तधाम आश्रमात दत्तजयंती उत्सवाची जय्यत तयारी असल्याने येथे लाखावर भाविकांनी हजेरी लावली होती
श्री दत्त शिखर संस्थान येथे मुख्य दत्तजन्म सोहळ्यास गडाचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. पुजाऱ्यांनी दत्त नामाच्या अध्यायाचे वाचन केले. पाळणा म्हणण्यात आला, भजन करण्यात आले. भगवान श्री दत्तप्रभुंच्या नामाचा गजर करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज, दिलीप भारती महाराज यांच्यासह विस्वस्थ व्यावस्थक उपस्थित होते .
माहूर गडावरील श्री देवदेवेश्वर संस्थान,योगी श्याम भारती महाराज यांचे आश्रम (केरोळी फाटा),श्री साईनाथ महाराज वसमतकर मठ यांच्यासह अनेक छोट्या, मोठ्या मठात, मंदीरात श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला.भाविक भक्तांनी आज मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने दत्त शिखर वरील दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.या वेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर साईनाथ महाराज वसमतकर मठात पुरणपोळी आणि आंब्याच्या रसाचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला तसेच स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर विविध ठिकाणी सुद्धा भाविकांसाठी महाप्रसादाचे पेंडोल टाकण्यात येऊन आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.ग्राम सेवक संघटने कडून शहरातील टी पॉइंट येथे महाप्रसादा ची व्यवस्था करण्यात आली होती. दत्त जयंती यात्रेत आलेल्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक नितीन काशीकर व त्यांच्या सहकार्यानि चोख बंदोबस्त ठेवला होता
शहरातील गडावर असलेल्या श्री आनंद दत्तधाम आश्रमात मठाधिपती राष्ट्रसंत साईनाथ महाराज बितनाळकर वसमतकर यांनी आलेल्या हजारो भाविकांना दत्तजन्म कथा सांगून दत्त जन्माचे महत्त्व सांगितले यावेळी हजारो भावीक उपस्थित होते तसेच आलेल्या भाविकांना पुरणपोळी तसेच आंब्याचा रसाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला