पोखरी येथे होतेय अवैधरित्या दारू विक्री भर चौकात हाॅटेलमध्ये दारु विक्रीला पाठबळ कुणाचे बिट जमादाराची कार्यवाही केवळ नावापुरतीच

यवतमाळ महागाव* – *(सदानंद जाधव)* तालुक्यातील पोखरी येथे भर चौकामध्ये हाॅटेलवर सर्रासपणे अवैद्य दारू विक्री होत आहे. हे माहित असूनही बिट जमादाराचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गावागावात सहज भर चौकामध्ये दारू उपलब्ध होत असल्याने तरूणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. यासंदर्भात महागांव पोलिस स्थानकातील उपनिरीक्षकांना गावातील नागरीकांनी सांगुन सुध्दा या उपनिरीक्षकांनी कार्यवाही केली नाही. पोलिसांनी कार्यवाही केवळ नावापुरतीच असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कार्यवाही करण्याची मागणी परिसरातुन होत आहे.

 

बिट जमादाराचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष !

 

पोखरी येथिल भर चौकात तसेच पोखरी बिटमध्ये व परिसरात गेली अनेक दिवसांपासून अवैधरित्या गावठी दारू विक्रीचे पेव फुटले असून बिट जमादाराचे यांकडे दुर्लक्ष होत आहे. पोखरी बिटमधिल नाल्यावर सर्रासपणे गावठी दारूच्या भट्ट्या संबंधतांकडून लावल्या जात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

 

पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’

 

भर चौकामध्ये दारु मिळत असलेल्यामुळे तरूण मंडळी व्यसनाच्या आहारी जात आहे. अनेकांच दारूमुळे संसारही उद्ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. कांही दिवसांपूर्वी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापा टाकून दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र या हाॅटेल व्यवसायिकांवर कार्यवाही माञ केली नाही. त्यामुळे सहज दारु उपलब्ध होत असल्याने पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी पोखरी बिट परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!