माजी विद्यार्थी मेळावा तसेच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

 

*पांढरकवडा (प्रफुल नांन्ने)*

केळापूर तालुका येथील ऊमरी ( रोड ) येथे श्री.गाडगे महाराज मिशन मुंबईचे सचिव तथा उमरी शाखेचे संचालक मा.श्री सचिन दादा घोंगटे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळ सञात माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्री.गाडगे महाराज मिशन मुंबईचे दिवंगत चेअरमन दलित मिञ आदिवासी सेवक कै.राजाराम बापू घोंगटे यांच्या जयंतीनिमित्त स्व.बापूंच्या स्मृतिस्थळाचे तसेच कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचे पुजन करुन बापुंच्या पावनस्मृतिस विनम्र अभिवादन करण्यात आले…त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा आठवणीतील क्षण हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.भाऊराव मरापे (माजी नगराध्यक्ष पांढरकवडा), प्रमुख अतिथी आर्णी केळापूर मतदार संघाचे माजी आमदार मा.श्री.राजुभाऊ तोडसाम,श्री मनोहर मेश्राम (सेनि.अभियंता),श्री किरणभाऊ कुमरे ,श्री.दत्ताभाऊ मालगडे, श्री.दिलीप कुंडकर,श्रीराम जिड्डेवार,श्री.प्रशांभाऊ बोंडे, सौ.वनिता ताई राठोड, डॉ.रेणुकाताई,श्री.विलासभाऊ आञाम,श्री.रमेश चव्हाण,अलिम भाई कुरेशी हे सर्व माजी विद्यार्थी तसेच श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे सचिव मा.श्री विष्णुभाऊ नाचवणे, माजी मुख्या.श्री.भोंगे सर व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज व कै.राजाराम बापू घोंगटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संस्थेच्या वतीने श्री सचिनदादा घोंगटे यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवर माजी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तद्नंतर सर्व माजी विद्यार्थांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणी जाग्या केल्या…शाळेच्या हिरक महोत्सवी वर्षांनिमित्त पुढील वर्षी होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच मा.श्री.विष्णुभाऊ नाचवणे यांनी स्व.राजाराम बापूंच्या आठवणींना उजाळा देऊन संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख मांडला श्री.भोंगे सरांनी आपल्या मनोगतातून स्व.बापूच्या कार्यकर्तृवाची ओळख करून दिली व माजी विद्यार्थी मेळावा उपक्रमाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मा.श्री.सचिनदादा घोंगटे व सुञसंचालन प्रा.शंकर चोपडे व माजी विद्यार्थी श्री.सुरेश मुंडाले यांनी केले या कार्यक्रमानंतर मेळाव्यास उपस्थित सर्व माजी विद्यार्थी तसेच सर्व मान्यवर शिक्षकवृंद कर्मचारीवर्ग व विद्यार्थी पालकवर्ग यांचा स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला.दुपार सञात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजना अंतर्गत उद् घाटन समारंभ घेण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक केळापूर तालुक्याचे तहसीलदार मा.श्री.राजेंद्र ईंगळे, प्रमुख अतिथी श्री.विजयभाऊ पाटील अध्यक्ष शाळा सुधार समिती चालबर्डी, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय तोडासे, उमरी गावचे उपसरपंच श्री. आकाश राठोड व विशेष उपस्थित मा.श्री विष्णुभाऊ नाचवणे सचिव ,श्री गाडगे महाराज मिशन मुंबई, माजी मुख्या.श्री भोंगे सर तसेच उमरी शाखेचे संचालक मा.श्री.सचिनदादा घोंगटे, माध्य. मुख्या. श्री.बायस्कर सर, प्राचार्य श्री दळवी सर प्राथ. मुख्या.श्री.आञाम सर व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री.गाडगे महाराज व स्व.राजाराम बापूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवराचे पुष्पगुच्छ व शाल आणि गाडगेमहाराजंचे पुस्तक भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.. यावेळेस तहसीलदार श्री ईंगळे साहेब तसेच श्री.विजयभाऊ पाटील, डॉ.संजय तोडासे, श्री.आकाश राठोड व श्री.विष्णुभाऊ नाचवणे यांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन आपल्या कलागुणांचा विकास करावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सचिनदादा घोंगटे सूत्रसंचालन प्रा.शंकर चोपडे व आभार प्राचार्य श्री.उमेश दळवी सरांनी मानले या उद्घाटनानंतर विद्यार्थांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला….वर्ग 1 ते 12 वी विद्यार्थ्यांनी गोंडी गीत कोलामी गीतावर लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली …तसेच बंजारा गीत, देशभक्तीपर गीत चिञपट गितावर बहारदार नृत्य सादर करून सरते शेवटी दंडार या आदिवासी पारंपरिक लोकनृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद कर्मचारीवर्ग व विद्यार्थी तसेच बहुसंख्य पालक व प्रेक्षक उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!