जालना (माऊली बाहेकर)*
हिंदू व मुस्लिम द्वेष पसरवणारे अनेक सिनेमे आपण पाहिले.परंतु येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होत असलेला सत्यशोधक नावाचा सिनेमा जो महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे.या मध्ये मुस्लिम बांधवांनी महात्मा फुलेंना कशी मदत केली हे या सिनेमा मधून पाहायला मिळणार आहे.
जोतिरावांना त्यांच्या वडिलांनी शाळेतून काढलं होतं.परंतु गफार बेग मुन्सी नावाच्या मुस्लिम व्यक्तीच्या सांगण्यावरून गोविंदरावांनी जोतिरावांना पुन्हा शाळेत टाकलं होतं.एवढंच नव्हे तर जेंव्हा महात्मा फुले व सावित्रीमाईंना स्वतःच्या घराबाहेर काढण्यात आलं.तेंव्हा त्यांना राहायला घर देणारे उस्मान शेख हे पण मुस्लिमच होते.सावित्रीमाई सोबत मुलींना शिकवण्यासाठी मदत करणाऱ्या फातेमा शेख या पण मुस्लिमच होत्या.
एकंदरीत मुस्लिम समाज बांधवांने फुले दाम्पत्याला कसे सहकार्य केलं होत हे या सिनेमातुन आपल्याला दिसणार आहे.म्हणून मुस्लिम बांधवांनाही विनंती आहे की आपण हा सिनेमा नक्की पाहावा.म.फुले यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध असेल व शेतकर्यांचा आसुड अशा अनेक व्यक्तिमत्त्वार चित्रपट असेल.बरीच उदाहरणं या चित्रपटात पाह्यला मिळणार आहे,असे प्रतिपादन शिवचरित्रकार संजय लगड यांनी केले आहे..