चोपड्यात शेतकरी संघटने कडुन रस्ता रोको आंदोलन.

*चोपडा(हेमकांत गायकवाड)*

दिनांक २७ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी ११ वाजेला चोपडा शहरातील श्रीनाथ प्राईड हॉटेल जवळ शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यां संदर्भात रस्ता रोकोआंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या मागण्या अशा आहेत कि कापसाला १५००० रुपये हमीभाव द्या,खरीप हंगामातील (कापूस)पीक विम्याची रक्कम त्वरित द्या,ऊसाला पहीली उचल ३००० रूपये द्या,केळी पिक विम्याची रक्कम त्वरित द्या,शेती मालाची निर्यात बंदी कायमची उठवण्यात यावी,शेताची विज १२ तास दिवसा व जळालेला विज ट्रांसफार्मर (डी पी) दोन दिवसांत द्या,केळी कांदा,पपई व सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची कट्टी बंद असताना ही कट्टी घेणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी,अशा प्रकारच्या विविध मागण्या शेतकरी व शेतकरी संघटनेच्या आहेत.आंदोलन सुरू असताना चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात,चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक के के पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे,भारत राष्ट्र समिती महिला जिल्हाध्यक्ष कोमल पाटील,यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा व शेतकरी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व निवेदन स्विकारले निवेदन देते वेळी संदीप पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष चोपडा,किरण एम.गुजर जिल्हाध्यक्ष जळगांव,विनोद पी.धनगर जिल्हा सरचिटणीस,सचिन शिंपी तालुका अध्यक्ष,चोपडा आधी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आंदोलन स्थळी पोलिस निरिक्षक.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!