भाज्यांचे भाव वाढले, तरी शेतकऱ्यांना तोटाच धुई,ढगाळ वातावरणामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम

सेलू (रमेश खराडे)*

 

भाजीपाल्यांचे भाव वाढले असले तरी उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होताना दिसत नाही. धुई, ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनावर परिणाम होत आहे.

शेती व्यवसायात शेतकऱ्यांना 12 महिने तोटा सहन करावा लागत आहे. शेतमालाचा चांगला भाव मिळाला तर रोगराई व इतर कारणांनी पिकांचे उत्पादन मिळत नाही. उत्पादन भरपूर मिळाले तर शेतीमालास बाजार भाव मिळत नाही. दोन्ही परिस्थितीत शेतकऱ्यांना तोटाच. तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप पिकांची जेमतेम उत्पादन मिळाले तर रब्बीची पेरणी पन्नास टक्के झाली आहे.

मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. तसेच पाणी उपलब्ध झाल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पेरला आहे. परंतु दररोज सकाळी व ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर होत असून रोगराईचे प्रमाण वाढलेआहे. शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर महागामोलाची कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. खर्च करून देखील भाजीपाल्याचे उत्पादन कमी प्रमाणात निघत आहे. तसेच बहुतेक शेतकरी सकाळी लवकर मिळेल त्या भावात भाजीपाल्याची ठोक दराने विक्री करतात. तर व्यापारी दिवसभर बाजारात किरकोळ पद्धतीने दाम दुप्पट दराने विक्री करतात. शेतकऱ्यापेक्षा दोन-तीन तास विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना जास्त फायदा होतो.

दोडके व वांगी 120 रुपये प्रति किलो, हिरवी मिरची, गाजर ६० रुपये, लसूण ३०० रुपये,भेंडी १०० रुपये, टोमॅटो बटाटे २० रुपये, कांदे, कोबी 30 ते 40 रुपये, अद्रक २०० रुपये, शिमला मिरची, कारली,शेवगा शेंगा 80 रुपये किलो, तर मेथीतिची जूडी १५ रुपये, व पालक जूडी १० रुपये प्रमाणे विक्री झाली.

 

 

चौकट

 

 

शेती व्यवसायात शेतकऱ्यांना १२ महिने तोटाच सहन करावा लागत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाला तर रोगराई व इतर कारणांनी पिकांचे उत्पादन मिळत नाही. उत्पादन भरपूर मिळेल तर शेतीमालास बाजार भाव मिळत नाही. दोन्ही परिस्थितीत शेतकऱ्यांना तोटाच.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!