एरंडोल (हेमकांत गायकवाड)
येथील शासकीय विश्रामगृह येथे भाजपची बैठक पार पडली या बैठकीत तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील यांच्या नेतृत्व व कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून एरंडोल पारोळा कासोदा येथील विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिनांक २६ डीसे.२०२३रोजी जाहीर पक्षप्रवेश केला.भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाचे एरंडोल पारोळा विधानसभा समन्वयक अनिल संतोष महाजन,एरंडोल तालुकाध्यक्ष अतुल गजानन जगताप,उपाध्यक्ष संजय त्र्यंबक पाटील,शहराध्यक्ष समाधान कैलास महाजन,उपशहर अध्यक्ष शंकर जगन पाटील,सचिव दिपक माधव पाटील,संजय पल्लीवाल यांनी प्रवेश केला.याप्रसंगी एरंडोल पारोळा विधानसभा प्रमुख करणदादा पाटील,पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,भाजपा जिल्हा चिटणीस निलेश परदेशी,यु.मो.जिल्हाध्यक्ष परेश पाटील,अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष दीपक अनुष्ठान,एरंडोल तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील पारोळा तालुकाध्यक्ष अनिल पाटील,ओबीसी तालुकाध्यक्ष बापू महाजन,पारोळा यु.मो.तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील,एरंडोल यु.मो.तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कंखरे,पारोळा शहराध्यक्षा मनिष पाटील,एरंडोल मा.शहराध्यक्ष निलेश परदेशी नगरसेवक पी.जी.पाटिल,एरंडोल शहराध्यक्षा नितीन महाजन,उपनगराध्यक्ष योगेश महाजन,भैयाभाऊ चौधरी,जितू गिरासे,ईश्वर ठाकूर,वाल्मीक ठाकरे,कैलास पाटील,विवेक ठाकूर,पिंटू राजपूत,श्याम ठाकूर,भगवान मराठे,आनंद सूर्यवंशी,पिंटू भाऊ,यांच्यासह एरंडोल पारोळा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.भाजप पक्षप्रवेश केलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून,व भ्रमणध्वनीवर संपर्क साधून लोकप्रिय खासदार उन्मेषदादा पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.