योजना चांगली पण वेशीला टांगली शेवगाव तालुक्यात जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामात निष्क्रियता….! शासनाच्या हर घर जल या संकल्पनेचा ग्रामीण भागात होत आहे बोजवारा….! टाकिसह, पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे….! वरिष्ठांच्या दुर्लक्षपणामुळे ठेकेदार कामात करतात हलगर्जीपणा…..!

 

शेवगाव (जयप्रकाश बागडे)

जलजीवन मिशन योजने अंतर्गत’ भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेशे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन योजना राबवून प्रत्येक कुटुंबाला ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे, परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात या जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याचे दिसून येत असून गावागावात ग्रामस्थ जलजीवन योजनेच्या अभियंत्याकडे व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करीत आहेत. शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचे काम तसेच पाईप लाईंचे काम हे बोगसपणे केल्याने येथील ग्रामस्थांनी शेवगाव येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केले आहेत. गेल्या दिड ते दोन वर्षापासून या योजनेच्या पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे परंतु काम हे चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करून बोगसपणे होत असलेल्या कामात लक्ष घालावे अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावात सुरू असलेल्या शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची कमी ही ठेकेदार व अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालली असल्याचा आरोप देखील सर्वत्र ग्रामस्थांकडून होत आहे.

 

चौकट :-

 

शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील ग्रामस्थांनी जलजीवनच्या

कामा संदर्भात आमच्या कार्यालयाकडे तक्रारी अर्ज केला आहे. त्या अनुषंगाने टाकीचे काम हे टेक्निकली बाब असल्याने ते काम पूर्णपणे पाडून नव्याने काम सुरू करणार आहोत. तसेच पाईपलाईनच्या

खोदकामा संदर्भात आलेल्या तक्रारीची योग्य ती चौकशी करून दुरुस्ती संदर्भात सूचना देण्यात येतील. तसेच मी स्वतः मी त्या कामाला भेट देऊन कामाची पाहणी करणार आहे.

 

राजेश कदम

गट विकास अधिकारी पंचायत समिती, शेवगाव

 

चौकट :-

 

एकेका ठेकेदाराला एवढी कामे….!

 

जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे गावातील सुस्थितीत असलेली विविध योजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी तुटल्याने पाणी पुरवठाही विस्कळीत झाला असून एकेका ठेकेदाराला एवढी कामे दिल्यानंतर त्यांच्या दर्जाचे काय होणार? क्षमतेच्या पलिकडे कामे असल्यास ठेकेदार ती वेळेत पूर्ण कशी करणार आणि कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा खालावणे व कामे वेळेत पूर्ण न होण्याचा धोका या भागात निर्माण झाला आहे.

 

चौकट :-

 

जिल्हापरिषदेच्या कारभाराबद्दल सर्वत्र संताप….!

 

जलजीवन मिशन योजनेतील प्रक्रियेत पारदर्शकता न राबवल्याने अनेक योजनांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी शेवगाव तालुक्यातील येत आहेत. करोडो रुपये खर्चुनही टंचाईग्रस्त नागरिकांना याचा फायदा होणार नसल्याने जिल्हापरिषदेच्या या कारभाराबद्दल संताप व्यक्त केले जात आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील ३७ गावात ही योजना राबवताना हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कंत्राटदारांना या सर्व योजनांची कामे देण्यात आली.

 

चौकट :-

 

योजना चांगली पण वेशीला टांगली….!

 

जलजीवन मिशनचा उद्देश राज्यांच्या त्या ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे, अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही आणि लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते. पण जल जीवन मिशनचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. घरोघरी पाणी देण्याच्या योजनेवरून गदारोड झाला आहे. योजना चांगली पण वेशीला टांगली अशी म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर

आली आहे.

 

चौकट :-

 

पाईपलाईनचे कामात ठिकठिकाणी नियमांना पायमल्ली…!

 

संबंधित ठेकेदाराने लवकर काम करण्यासाठी नियमांना फाटा देत रस्त्याच्या अगदी जवळून साइडपट्टी खोदत पाइप टाकले तर काही ठिकाणी डांबरी रस्ता जेसीबीने उखडून टाकला. पाइपलाइन रस्ता सोडून दोन ते तीन मीटर बाहेर करणे आवश्यक असते. मात्र ठेकेदाराने रस्त्याच्या लगतच खोदकाम केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे परीसरातील नागरिक याबाबत संताप व्यक्त करत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!