आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या विविध आदिवासी संघटनेचा चोपडा तहसिलवर धडकला जनआक्रोश मोर्च

चोपडा (हेमकांत गायकवाड)

तालुक्यातील एका गावात काही दिवसापुर्वी अशोक देवराम पाटील या नराधमाने बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले होते.परंतु या नराधमास फाशीची शिक्षा होण्यासाठी आदिवासी संघटनांनी चोपडा येथील विश्रामगृह येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय पर्यंत आदिवासी संघटना एकत्र येऊन नराधमास फाशीची शिक्षा मिळावी नाबालिक मुलीस न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्या नंतर निवेदन घेण्यासाठी काही कारणास्तव तहसीलदार हे तेथे उपस्थित नसल्याने एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी निवेदन नायब तहसीलदार दत्ताञय नेतकर व पोलीस निरीक्षक के के पाटील यांना दिले.यावेळी ढवळे म्हणाले की तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना खुर्चीचा जास्त मोह आहे असे म्हणत त्यांना धारेवर धरले व निवेदन देतेवेळी असे म्हटले की लवकरात लवकर पीडित मुलीस न्याय मिळावा नाहीतर यापुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचे होईल असे देखील त्यावेळेस ढवळे म्हणाले याप्रसंगी उपस्थित भारत राष्ट्र समितीतर्फे कोमल पाटील जिल्हाध्यक्ष व इतर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.यात आदिवासी विविध संघटना आदिवासी टायगर सेना,एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य,एकलव्य क्रांती संघटना,एकलव्य आदिवासी युवा संघटना,आदिवासी एकता परिषद,अखिल भारतीय एकलव्य संघटना,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,जय आदिवासी युवा शक्ती संघटना,भिल्ल समाज विकास मंच,शबरी माता बिल विकास संस्था,बहुजन समाज पार्टी,भारत राष्ट्र समिती,आधी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जन आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला.

कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जन आक्रोश मोर्चा करिता शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील जन आक्रोश मोर्चे साठी चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!