मेहकर (उध्दव फंगाळ) संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका,मदतनीस व कर्मचाऱ्यांचा ४ डिसेंबर पासून बेमुदत संप सुरु असल्याने संपूर्ण राज्यातील बालकांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे परंतु कुपोषित बालके तसेच गरोदर माता व गर्भवती मातांना पोषण आहाराचा पुरवठा होत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे तसेच कुपोषित बालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे या संपूर्ण बाबींचा विचार करुन शासनाने संपूर्ण राज्यातील अंगणवाड्या शासनाच्या ताब्यात घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियक्त करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यामुळे आज २९ डिसेंबर रोजी मेहकर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व कर्मचाऱ्यांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकार मधील सत्ताधारी खासदार प्रतापराव जाधव यांच्या शिवसेना कार्यालयावर मोर्चा नेला आणि त्या ठिकाणी त्यांनी निवेदन सादर केले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील असून त्यांना अंगणवाडी सेविका, मदतनीस व कर्मचाऱ्यांचा प्रश्नांची जाण असून याबाबत ते लवकरच सकारात्मक तोडगा काढतील असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले या बाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन च्या वतीने ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार,महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे,सचिव महिला व बालविकास विभाग आणि आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना कायदेशीर नोटीस दिली असल्याचे निवेदन मेहकर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व कर्मचाऱ्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांना सादर केले असून निवेदनावर रेखा माने,कावेरी तिडके,मिनाक्षी चव्हाण,विद्या पनाड, निर्मला सुरजने,अनिता चनखोरे,संघमित्रा पवार,रंजना सपकाळ,सिंधू चांगाडे,गिता शेळके,आशा गुडधे, यास्मिन शाहा, वंदना आराख,मिना नेमाडे, संतोषी मोरे,सुरेखा गायकवाड,माया शिंदे,आरशी शेख जहीर,आसिया महंमद सईद,अर्चना काटकर, संजिवनी माघाडे, चंद्रकला सपकाळ, सुवर्णा पैठणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत