शेवगावात गावठी कट्ठा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद

शेवगाव(जयप्रकाश बागडे )

 शेवगाव ते पाथर्डी जाणारे रोडवर गाडगेबाबा चौक येथे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी एक इसम येणार आहे अशी गुप्त बातमी मिळाल्याने वरील ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी पंच लागेच खाजगी वाहणाने रवाना होउन सापळा रचून खात्री केली असता दि. २९/१२/२०२३ रोजी रात्री १२:३० वाजता एक अनोळखी इसम गाडगेबाबा चौक येथे येताना दिसला तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलीसांनी त्यास जागीच मोठ्या शिताफीतीने पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जहीर उर्फ जज्या नवाब शेख रा. नाईकवाडी मोहल्ला शेवगाव ता. शेवगाव असे सांगितले.तेव्हा पोलीस स्टाफ यांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या डाव्या कमरेला एक गावठी कट्टा व मॅक्झीन मध्ये ०३ जीवंत काडतूस व दोन मोबाईल असा एकुन ४८,००० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने लगेच दोन पंचासमक्ष ते जप्त करून त्या नंतर पोलीस कॉस्टेबल शाम बाबासाहेब गुंजाळ यांचे फिर्यादीवरून आरोपी जहीर उर्फ जज्या नवाब शेख रा.नाईकवाडी मोहल्ला शेवगाव ता.शेवगाव याचे विरूध्द शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं.१२०७/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७, प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलिस उपनिरीक्षक निरज बोकिल, पो.हे.कॉ सुधाकर दराडे पो.कॉ.शाम गुंजाळ,यांनी केली असून पुढील तपास पोसई निरज बोकिल हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!