मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, 61 वाहनधारकांची तपासणी! 39 वाहनधारकांवर केली कारवाई. मंठा पोलिसांनी विशेष मोहीम

                                                               मंठा (डॉ आशिष तिवारी) शहरात मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 61 वाहनधारकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 39 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यामध्ये एकूण 21 हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. सदरची कार्यवाही वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार करण्यात आली आहे. मंठा शहरात विनापरवाना दुचाकी चालवणे, विना नंबर व फॅन्सी नंबर प्लेट, तसेच ट्रिपल सीट गाडी चालविणाऱ्या दुचाकी वाहनावर व वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. सदर तपासणीमुळे एकूण 61 वाहनधारकांची तपासणी करण्यात येऊन 39 दोषी वाहनांवर तंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. ही कार्यवाही वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, मंगेश चौरे, प्रशांत काळे, मनोज काळे, आनंद ढवळे, रवींद्रअण्णा बिरकायलू, सतीश आमटे, कानबा हराळ, संतोष बनकर, आसाराम मदने, सुनील होंडे, जगन्नाथ सुक्रे, मुंजा कोलगणे, संजय चव्हाण आदींनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!