माहूर (अमजद खान) तीर्थक्षेत्र माहूर नगरीत प्रथमच तालुका व जिल्हा संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकारांचे राज्यस्तरीय संमेलन दिनांक १३ जानेवारी होत असून या अभूतपूर्व सोहळ्याची माहूर तालुका पत्रकार संघाकडून जय्यत तयारी सुरू असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाच्या तय्यारीचा आढावा घेतला जात आहे.
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपआपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असतात, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असतात.अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्यस्तरावर गौरव करण्याचा निर्णय परिषदेने घेतला.त्यानुसार गेली दहा वर्षे मराठी पत्रकार परिषद हे पुरस्कार देत आहे. या वर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर_नगर आणि दक्षिण_नगर जिल्ह्यांना विभागून देण्यात आला आहे. तर वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड,माहूर तालुका पत्रकार संघ, जिल्हा नांदेड,साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा धुळे,शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे,तेल्हारा तालुका पत्रकार संघ, जिल्हा अकोला,बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली,आर्वी तालुका पत्रकार संघ, जिल्हा वर्धा,अंबरनाथ तालुका पत्रकार संघ,जिल्हा ठाणे यांना घोषित झाला आहे.माहूर ला हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार असून माहूर तालुका संघ आणि नांदेड जिल्हा संघ कार्यक्रमाच्या तय्यारी ला लागला असून राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांची निवासाची व इतर व्यवस्था चांगल्या प्रकारची व्हावी म्हणून माहूर ची टीम जय्यत तयारीला लागली आहे.या कार्यक्रमाला राज्यभातून मोठ्या संख्येने पत्रकार येणार असल्याने हा कार्यक्रम यशस्वी होईल असा विश्वास मुख विस्वस्त एस.एम देशमुख यांनी दिनांक २७ रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत बोलून दाखविला तर काल दिनांक २८ रोजी नांदेड जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी,महानगर उपाध्यक्ष प्रल्हाद लोहेकर, राजकुमार कोटलवार यांनी आयोजित मेळाव्याच्या अनुषंगाने माहूर येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेत कार्यक्रम स्थळ पाहणी व इतर नियोजनाबाबत स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली.माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी,वसंत कपाटे,विजय अमाले,नंदकुमार जोशी,ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, राजकुमार पडलवार,गजानन भारती साकुरकर यांनी तय्यारीचा आढावा दिला.या वेळी माहूर येथील स्थानिक अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.