श्री खंडेराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था संचालित अनाथ आश्रम साब्रा येथे भक्ती रेडिमेड यांच्यावतीने विद्यार्थ्यांना जॅकेट व स्वेटर वाटप

मेहकर( उध्दव फंगाळ)

येथून जवळच असलेल्या साब्रा येथील श्री खंडेराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था संचालित अनाथ आश्रम (रजि .नं. एफ१९०५७) मध्ये स्वर्गीय शिवशंकर (लालाजी) अवस्थी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भक्ती रेडिमेड मेहकर यांच्या वतीने एकूण ७१ वारकरी विद्यार्थ्यांना जॅकेट व स्वेटरचे वाटप करण्यात आले.

श्री अशोकभाऊ अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अमितभाऊ अवस्थी , चि.राजवीर अवस्थी (भक्ती रेडिमेड)
यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांचा थंडीपासून बचाव व्हावा म्हणून स्वेटर व जॅकेटचे वाटप केले व विद्यार्थ्यांना मायेची ऊब दिली.
या प्रसंगी श्री अशोकभाऊ अवस्थी , श्री अमितभाऊ अवस्थी , चि.राजवीर अवस्थी, श्री बबलुभाऊ मुंदडा (विश्वस्त, श्री शारंगधर बालाजी संस्थान मेहकर) ,श्री ह.भ. प.भागवत महाराज भिसे (तालुकाध्यक्ष वारकरी महामंडळ मेहकर तालुका ), श्री गोपाल शिरसाट व इतर उपस्थित होते. आश्रमाच्या वतीने आश्रमाचे संस्थापक श्री. ह.भ.प.श्री सहदेव महाराज ठोकरे यांनी आभार व्यक्त केले..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!