प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोनाची बुलढाण्यात एन्ट्री | ◼️ चिखलीतील आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह | ◼️JN.1 व्हेरिएंट तपासणीसाठी नागपूरला स्वॅब पाठविणार

बुलडाणा (रणजितसिंह राजपूत)

संपूर्ण जगाला आपल्या कचाट्यात धरून ठेवलेल्या कोरोनाने आपली पकड पुन्हा एकदा मजबूत केली असल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. संपूर्ण देशभरामध्ये कोरोना व्हायरसच्या जेएन वन व्हेरीएंटचे रुग्ण आढळत असून सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थात हा व्हायरस तितका प्रभावशाली नसल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे. परंतु व्हायरस कडे दुर्लक्ष करून चालणार नाही, उपचार आणि काळजी महत्त्वाची असेही संशोधक म्हणतात.

जवळपास सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाची एन्ट्री झाली आहे. कोरोना व्हायरसच्या बाबतीत बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट देण्यामध्ये गुड इव्हिनिंग सिटी सदैव क्रमांक एकवर राहिला आहे. आज सकाळी चिखली येथील एक आरोग्य कर्मचारी कोरोना संसर्गित आढळला आहे. लक्षणे जाणवल्याने या 48 वर्षीय कर्मचाऱ्याने कोरोना रॅपिड टेस्ट केली. त्यात सदर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोना संसर्गित रुग्ण बुलढाणा शहरातील चिखली मार्गावर हाजी मलंग दर्ग्याच्या मागे असलेल्या एका नगरात राहतो.

त्याला होम आयसोलेटेड करण्यात आले आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात 25 डिसेंबर पासून बुलढाणा जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगला सुरुवात झाली असून आतापर्यंत 74 जणांची आरटीपीसीआर आणि 1136 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे. केवळ एकच जण कोरोना संसर्गित असल्याचे आढळून आले आहे. कोरोना बरा होणारा रोग असल्यामुळे घाबरून न जाता उपचार आणि काळजी घ्यावी असे आवाहन गुड इव्हिनिंग सिटी कडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!