शिर्डी (राजेंद्र बनकर)
नवीन वर्षाचे स्वागताकरीता दानशुर साईभक्त बी. ए. बसवराजा यांच्या देणगीतुन श्री साईबाबांचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी साईनगरीत हजेरी लावली असुन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर नविन वर्षाचे औचित्यावर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंञी दिपक केसरकर यांनी सहपरिवार श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे.
श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबर रोजी राञभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने लाखो भाविक साईचरणी नतमस्तक झाले तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री साईबाबा मंदीरात नवीन वर्षानिमिमित्त शिर्डी नगरीत श्री साईभक्तांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली आहे. शिर्डीत नगरी भाविकांनी फुलून गेली असुन श्री साईबाबा समाधी मंदिर मंदिर परिसर साईभक्त निवास , साई प्रसादालय व नगर मनमाड रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.