राहुल साबळे/शेंदुरजन
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे दोनशे सहाव्या शौर्य दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेरा बुद्रुक गावचे उपसरपंच दिनकर दौलत डोंगरदिवे हे होते. तर उद्घाटक मेरा बुद्रुक गावच्या सरपंच सौ .अनिताताई लक्ष्मण वायाळ ह्या होत्या. महापुरुषाच्या प्रतिमेला हार अर्पण करून, दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संविधान प्रचारक बुलढाणा येथील व्याख्याते राजेश गवई सर यांनी प्रथम”शौर्य दिनानिमित्त” भिमा कोरेगाव येथील लढाई ही कोणी कोणी लढली आणि कशासाठी लढली याचे सविस्तर माहिती दिली. आपल्या व्याख्यानात भीमा कोरेगाव चा लढा हा स्वाभिमानासाठी, आत्मसन्मानासाठी, न्याय ,हक्कासाठी, पेशव्यांच्या अन्याय ,अत्याचाराच्या विरोधात लढला गेला. आणि तो लढा विजय सुद्धा झाले म्हणून या दिनाला खूप महत्त्व प्राप्त होऊन ऐतिहासिक म्हणून गणला गेला. असे त्यांनी सांगितले. त्यानंतर संविधानाबद्दल सविस्तर अशी माहिती त्यांनी सांगितली पुढे व्याख्यानात ते म्हणाले संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळाची गरज आहे. हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. केवळ संविधानामुळेच माणसाला भाषण स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामुळेच प्रगती झालेली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन वायाळ माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा ग्रामपंचायत सदस्य मेरा बुद्रुक यांनी शौर्य दिनाबद्दल सखोल माहिती सांगितली. पुढे ते म्हणाले की व्याख्यानासारखे समाज जनजागृती, ज्ञानाची भर पाडणारे कार्यक्रम जर आयोजित केले तर निश्चितच बौद्धिक विकास होण्यास मदत होते.प्रमुख उपस्थिती म्हणून अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील, शिवसेना नेते राजु पाटील, यांनी मार्गदर्शन केले.उपसरपंच दिनकर डोंगरदिवे यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रमुख उपस्थितीमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष राजुभाऊ पाटील,ग्रामपंचायत सदस्य सागर पडघान, ग्रामपंचायत सदस्य सौ. कमल जोहरे सौ .अर्चना डोंगरदिवे, माजी सरपंच मच्छिंद्र डोंगरदिवे, संतोष तोडे, लिंबाजी डोंगरदिवे, हे होते. अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी बीट जमदार देठे साहेब यांची उपस्थिती होती. जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार सुनिल अंभोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन डोंगरदिवे, राहुल हिवाळे, राहुल डोंगरदिवे ,विकास डोंगरदिवे, शुभम साळवे, विलास डोंगरदिवे, आश्विन अंभोरे, निलेश डोंगरदिवे, पवन डोंगरदिवे, हर्षल डोंगरदिवे, सोनू डोंगरदिवे, सागर डोंगरदिवे, गौतम डोंगरदिवे सुशील डोंगरदिवे उमेश डोंगरदिवे ,सुमित डोंगरदिवे, किरण डोंगरदिवे, कीर्ती कुमार डोंगरदिवे, साहिल डोंगरदिवे, रितेश पैठणे, दादु डोंगरदिवे, तथा समस्त नवयुवकांनी परिश्रम घेतले.
