बेलगाव येथे बोगस डॉक्टर वर कारवाई मेहकर तालुक्यात कारवाई कधी होणार उलट सुलट चर्चेला उधान

मेहकर (उद्धव फंगाळ ) कोरोनाच्या भीतीमुळे आरोग्याचा प्रश्न गेल्या तीन चार वर्षापासून भेडसावत आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे अशा परिस्थितीत अजूनही नागरिकांमध्ये थोडीफार का होईना मात्र कोरोना संदर्भात भीती कायम आहे त्याचबरोबर दैनंदिन जीवनात विविध आजारांचा सामना गोरगरिबांना करावा लागत आहे अशा परिस्थितीत मेहकर शहरात व ग्रामीण भागात अशा भोळ्या बाभड्या रुग्णांचा गैरफायदा घेऊन अनेक बोगस डॉक्टर गोरगरिबांच्या जीवाशी खेळत आहेत असाच प्रकार मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे दिसून आला या ठिकाणचे बोगस असणारे डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी उपचार करतात ही गोष्ट गावकऱ्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा कळत नकळत माहिती आहे मग आतापर्यंत या डॉक्टरवर कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहेत तर मेहकर शहरात व ग्रामीण भागात अनेक खेडेगावात असे बोगस डॉक्टर दररोज फिरताना दिसत असतात मेहकरातील एखाद्या नामांकित डॉक्टरच्या हाताखाली काही महिने काम करून लहान लहान मुले किंवा समवयस्कर व्यक्ती सुद्धा थातूरमातूर वैद्यकीय व्यवसायाची माहिती घेऊन ग्रामीण भागात आपला व्यवसाय करताना आढळून येतात हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे संबंधित अधिकारी संबंधित गावकरी यांना ह्या गोष्टी 100% माहित आहेत मग त्याचवेळी कारवाई का होत नाही एखाद्या व्यक्तीने जर आरोग्य विभागाकडे तक्रार केली त्यानंतरच आरोग्य विभाग कारवाई करण्यासाठी समोर येतात हे कितपत योग्य आहे याचा अर्थ वैद्यकीय क्षेत्राचे जे बोगस काम होतात किंवा होत आहेत याला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची मुकसंती असल्याचे दिसून येत आहे केवळ फक्त तक्रार आली त्यावेळेसच कारवाई करायची व जर तक्रार आली नाही तर कारवाई करायची नाही असाच प्रकार सध्या मेहकर तालुक्यात सुरू आहे बेलगाव येथे झालेली कारवाई जरी खरी असली तरी मग इतर ठिकाणी जे बोगस डॉक्टर गोरगरिबांच्या रुग्णाशी खेळत आहेत अशा डॉक्टरवर कधी कारवाई होणार असाही प्रश्न जनतेमधून विचारल्या जात आहे ,का आरोग्य विभाग फक्त तक्रार येण्याची वाट पाहणार असेही बोलल्या जात आहे मात्र काहीही असले तरी गरीब रुग्णावर उपचार करण्याचे जे बोगस डॉक्टर धाडस करत आहेत याला कळत नकळत आरोग्य विभागाच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जर नियमानुसार कारवाई करायची असेल तर आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर विरोधात धडक मोहीम राबविण्याची गरज आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!