मेहकर (उध्दव फंगाळ)
दिनांक 3 जानेवारी 2024 क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणार्या महिलांचा सन्मान कार्यक्रम संत सेना महाराज मंदीर सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले महिला मंडळ मेहकर च्या वतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये सुरूवातीला मासाहेब जिजाऊ , सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन सर्व महिलांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. भाग्यश्री इंगळे आणि जयश्री इंगळे या दोघी बहीणींनी स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले.त्यानंतर उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणार्या महिला सिमा राहूल चाटसे, दुर्गा गजानन इंगळे, छाया संदीप शिंगणे, अन्नपूर्णा रमेश इंगळे, मंगल संतोष कुटे यांचा शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि बुके देऊन सर्व महिलांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल अनुक्रमे संगीता माने, सुनीता कुडके, मनिषा गि-हे आणि शितल चनखोरे यांनी उपस्थितांना माहिती सांगितली. त्यांच्या या कार्याबद्दल आणि जीवनाबद्दल ऐकून उपस्थित महिलांचे डोळे पाणावले व त्यांना प्रेरणा मिळाली. सन्मान सत्काराला उत्तर देतांना सीमा चाटसे आणि प्रा.डॉ.मंगल कुटे यांनी आयोजकांचे आभार मानले आणि सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
उपस्थित सर्व बालिकांचा पुष्पगुछ देऊन सन्मान करुन बालिका दिन साजरा करण्यात आला. कु. पलक शिंगणे हिने भाषण करुन आणि कु.गौरी शिंगणे हिने गीत सादर करुन सावित्रीबाईंना अभिवादन केले. तसेच महिलांचा सन्मान करुन महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला.
मनिषा गि-हे मॅडम यांनी सावित्रीबाईंचे गीत सादर केले. 5 जानेवारी रोजी प्रकाशित होणार्या सत्यशोधक चित्रपटाचे प्रमोशन व चित्रपट सिनेमगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन विनोद बोरे यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री इंगळे, प्रास्ताविक संगीता माने आणि आभारप्रदर्शन कल्पना शिंगणे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळ मेहकर, माता रमाई महिला मंडळ मेहकर, संत सेना महाराज मंदीर परिसरातील महिला मंडळ, कॉलनीतील सर्व महिला तसेच पुरुष मंडळी यांची उपस्थिती तथा सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला मंडळ मेहकरच्या सुनीता नंदकिशोर कुडके, रंजना अमोल मगर, चंद्रकला केशव गि-हे, मनिषा योगेश गि-हे, कल्पना राजू शिंगणे, शितल ज्ञानेश्वर चनखोरे, मीरा गणेश मगर, रेखा अनिलकुमार गाभणे, नीता शाम इंगळे, संगीता मोहन माने, शारदा देसाई, संगीता गि-हे, सविता अवचार, प्रिया मुदमाळी, राजश्री इरतकर, बेबी वानखेडे तसेच नंदकिशोर कुडके, अमोल मगर, केशव गि-हे यांनी परिश्रम घेतले.
