साखरखेर्डा(दिलीप वणवे)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथील शिवानी गवई यांना सावित्रीबाई फुले नारीशक्ती २०२३-२४ पुरस्काराने मान ,सम्मानाने सम्मानित करण्यात आले .प्रमुख अतिथी मा.अन्न औषध प्रशासन मंत्री तथा आमदार मा. डॉ .राजेंद्र शिंगणे साहेब शेतकरी नेते मा.राज्य मंत्री रविकांत जी तुपकर साहेब समाजभूषण मा.अर्जुन गवई साहेब यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वत्सलाबाई बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था साखरखेर्डा दैनिक महाराष्ट्र सारथी,चौफेर दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.आयोजक पत्रकार संपादक मा.सचीन खंडारे आणि गणेश पंजरकर यांनी सामाजिक क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिवानी गवई यांची पुरस्कारासाठी निवड केली होती .त्या कमी वयामध्ये पोस्ट मास्तर या पदांवर रूजू झाल्या आहेत व पुढील
उच्च शिक्षण घेतं असून गरजूंना मदत करत सामाजिक कार्य करतं आहेत.मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सर्व क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जातं आहे.
