देऊळगाव माळी (उध्दव फंगाळ)
प्रति पंढरपूर देऊळगाव माळी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे पुरातन भव्य मंदिर आहे .या गावाला सर्वजण प्रति पंढरपूर म्हणून ओळखतात .या गावा शेजारून एक सुंदर अशी नदी वाहते .या नदीला कोणतेही नाव नव्हते .या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी गावाजवळ आल्यावर पंढरपूरच्या चंद्रभागेप्रमाणे गावाला गोल विळखा मारून जाते .गावामध्ये विठ्ठलाचे भव्य पुरातन मंदिर आणि गावाला चंद्राच्या कोरीप्रमाणे विळखा घालून गेलेली सुंदर नदी असा हा दैवी योग म्हणावा लागेल .गुरुवर्य श्री ज्ञानदेव बळी सर यांनी सदर नदीला प्रति चंद्रभागा हे नाव देण्यास हरकत नाही असे आपले मत व्यक्त केले .समाजसेवक शिवशंकर मगर यांनी श्री पांडुरंग संस्थानच्या सभेमध्ये हा विषय मांडला. लगेच गावकऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला .संकल्प पूर्ती जन्मोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये या नदीचे नामकरण करण्याचे ठरले. व आज दिनांक 4 जानेवारी या दिवशी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये सर्व गावकऱ्यांनी नदीवर जाऊन वेदांताचार्य राठोड महाराज यांच्या हस्ते पूजन करून नदीचा प्रति चंद्रभागा म्हणून नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हरिभक्त परायण प्रकाश महाराज ,गावचे सरपंच किशोर भाऊ, गाभणे श्री पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष बाबुराव बळी, पत्रकार राजेश मगर, पंचायत समिती सदस्य शिवा भाऊ मगर, जगन्नाथ चांगाडे ,ज्ञानदेव बळी सर ,शिवशंकर मगर ,शिवा पाटील, भिका पाटील ,गावकरी व विठ्ठल भक्त हजर होते
