मेहकर (उध्दव फंगाळ)
विवेकानंद परिवार, व विवेकानंद फाउंडेशन तसेच दि.विवेका ग्रुप यांच्या तृतीय स्थापना दिनानिमित्त आयोजित “सेवा सप्ताह कार्यक्रम” सावित्रीबाई फुले व शारदा माता जयंती निमित्त 3 जानेवारी 2024 रोजी सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड येथे अनाथ,अपंग,वृद्ध,मनोरुग्ण निराधारांसोबत संपन्न झाला.
कुणाला घरदार नाही, कुणाला सांभाळायला जिव्हाळ्याची माणसं नाहीत, कुणी कायमचं अपंग झालेले तर कुणी मानसिक संतुलन हरवून बसलेले…!
प्रत्येकाची वेगवेगळी दु :ख मात्र,प्रत्येकाच्या जीवनात दाटलेला आहे एकच गर्द अंधार आणि ह्या अंधाराच्या साथीने ते चालत आहेत आपल्या जीवनाची वाट…!
अशा भावविश्वच उजाडलेल्या अंध, अपंग, वृध्द, निराधार व मनोरुग्णांचे एकमेव आश्रयस्थान असलेल्या सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये विवेकानंद फाउंडेशन च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शारदा माता यांच्या जयंतीनिमित्त अन्न सेवा व साहित्य वाटप करण्यात आले.तसेच सेवा संकल्पचे प्रमुख डॉ.नंदकिशोर पालवे यांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजेच आनंदीच्या नावाने आजारमुक्त आजार मुक्त माता बांधवाणी हस्त कले तून सुरू केलेली आहे. मनोरुग्णांना बरं करून त्यांच्या हाताला काम देऊन आगळावेगळा सामजिक उपक्रम सुरू केला गेलेला आहे. हे सामाजिक कार्य ओळखून परिवाराच्या वतीने आपल्या आजारमुक्त माता बांधवांनी तयार केलेल्या आनंदी सांबराणी धूप कप च्या 500 बॉक्स ची ऑर्डर दिली…
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ सतीश कुलकर्णी होते तर प्रमुख उपस्थिती मधे विवेकानंद अर्बनचे अध्यक्ष ॲड. शिव ठाकरे पाटील,सचिव स्वप्नील खराटे, उपाध्यक्ष गणेश निकस,जितू अडेलकर,दिलीप बोरे,सर्वश्री संचालक,स्थानिक संचालक होनाजी महाराज,विजय जवंजाल,शिवाजी वानखेडे, सचिन लोढे, गिरीश शेळके, प्रशांत काळे सर,प्रकाश ठाकरे,संजय मोहरूत,सतीश मवाळ, गोविंद शेळके,महेश ठाकरे, विश्वनाथ वाघ,प्रतीक मीटकरी सर,आकाश धोटे,सह रोहित सोळंके,भूषण काळे, विशाल फितवे,समाधान पदमने,मुख्यालय व्यवस्थापक शुभम मवाळ,जानेफळ शाखा व्यवस्थापक रोहन उपाळे, शहर शाखा व्यवस्थापक वैभव गरड,रोखपाल शुभम अवचार,अक्षय रहाटे,दिपक निकस,कल्याणा गावचे सरपंच संजय सोनुने,उपसरपंच कैलास गाडे,सदस्य विश्वासराव अवसरमोल इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
ह्या प्रसंगी रयत क्रांती संघटनेचे जितू अडेलकर,दिलीप बोरे, ॲड.शिव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तर डॉ नंदकुमार पालवे यांनी सेवा संकल्प विषयी माहिती दिली,सूत्र संचालक विशाल फितवे यांनी तर आभार गणेश यांनी मानले..
