योगेश गणगे यांची शिवसेना (शिंदे गट) युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड.
-
मंठा (डॉ आशिष तिवारी.)
मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे व युवा सेना जिल्हाप्रमुख अजय कदम यांच्या शिफारशीनुसार योगेश ज्ञानेश्वरराव गणगे यांची शिवसेना शिंदे गट युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी परभणी येथे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची सभा होणार असून सभेची पूर्वतयारी म्हणून दिनांक 2 जानेवारी 24 रोजी श्रीकृष्ण गार्डन परभणी येथे आढाव बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीत शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख मोहनजी अग्रवाल, युवा सेना प्रमुख अजय कदम, मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. तळागाळात नावलौकीक मिळवलेले, तसेच सर्वच क्षेत्रात हुशार, प्रतिष्ठीत, समजदार, शांत, संयमी, सर्व गरजवंतांना नेहमीच मदत करणारे, उच्च शिक्षित, अष्टपैलु व्यक्तिमत्व असणारे योगेश गणगे यांची युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी अंत्यंत महत्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली. त्याबद्दल जेष्ठ नेते प्रल्हादराव बोराडे यांच्या हस्ते मंठा येथे शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. वरीष्ठ पदाधिकारी मंठा परतूर तालुक्याचे तसेच विवीध क्षेत्रातले असंख्य सहकारी, संपूर्ण ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ते, मित्र मंडळी, नातेवाईक आणि ईतर सर्व क्षेत्रातिल मंडळी कडून त्यांच्या या निवडीबद्दल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
error: Content is protected !!