मेहकर (उध्दव फंगाळ)
मेहकर मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी व आमदार झाल्याचे स्वप्न पाहणाऱ्या काही लोकांकडून केवळ निवडणुकीच्या तोंडावर साहित्य वाटप करण्यात येत आहे मात्र इच्छुकांनी हे लक्षात ठेवावे की मेहकर मतदार संघातील जनता आता हुशार झाली आहे केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदार संघात येऊन भेटीगाठी करून तुरळक किरकोळ साहित्य वाटप करून आमदार होता येणार नाही रात्रंदिवस लोकांच्या सुखदुःखात राहून समस्या सोडवाव्या लागतात मेहकर मतदारसंघातील जनता आता हुशार झाली असून अनेक इच्छुकांचा किंवा निवडणूक लढविण्यार्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे मेहकर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अगदी काही महिन्यात अनेक इच्छुकांच्या वाऱ्या मेहकर मतदार संघात वाढले आहेत पाच वर्षे मोठ्या शहरात राहून केवळ निवडणुकीपुरते मेहकर मतदार संघात अनेक इच्छुक चकरा मारत आहेत नवी जुनी ओळख काढत आहेत सोयरे संबंधी नातेवाईक मित्रपरिवार यांच्याशी हितसंबंध जोडताना दिसत आहेत तर गोरगरीब मतदार राजाला भुलवण्यासाठी अनेक इचुकांकडून विविध स्वरूपाचे साहित्य वाटप करण्यात येत आहे हे साहित्य वाटप करत असताना अनेक ठिकाणी अर्धवट साहित्य देण्यात आल्याने गोंधळ सुद्धा निर्माण झाला आहे तर नाराजीचा सूर सुद्धा दिसून येत आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ऐन निवडणुकीच्या वेळेवर मतदार संघात आल्यामुळे नेमके काय कार्यक्रम घ्यावे लोकांना एकत्रित जमा कसे करता येईल यासाठीच इच्छुकांची धावपळ होताना दिसत आहे मात्र इच्छुकांनो हा सुज्ञ मतदार वर्ग आहे त्यामुळे कोणी कितीही प्रलोभने दाखविले कितीही साहित्य वाटप केले तरी मेहकर मतदार संघातील जनता अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे दिसून येत आहे मात्र लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा निवडणूक लढविण्याचा स्वतंत्र अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक जण निवडणूक लढवू शकतो त्याबद्दल दुमत नाही मात्र केवळ निवडणुकीपुरतेच मतदार संघात यायचे व निवडणूक झाल्यानंतर पाच वर्ष मेहकर मतदारसंघात फिरकायचे सुद्धा नाही असा अनुभव मेहेकर मतदार संघातील जनतेला मागील अनेक वर्षात आलेला आहे त्यामुळे आता मेहकर मतदार संघातील जनता सुद्धा हुशार झाली आहे कोण आपल्या सुखा दुखात वेळेवर हजर राहतो गावातील समस्या कोण सोडवतो वेळेवर आपल्याला कोण मदत करतात हे सर्व जनता जनार्दनांना माहिती आहे मात्र सध्या काही हौसे नवसे व आमदारकीचे डोहाळे लागलेले इच्छुक उमेदवार यामुळे मेहकर मतदार संघात चांगलीच रंगत दिसून येत आहे दररोज असे इच्छुक उमेदवार मेहकर लोणार तालुक्यातील कोणत्या ना कोणत्या खेडेगावात पाहायला मिळतातच आहेत अजून निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही मात्र इच्छुकांनी आपला संपर्क वाढविण्याचे दिसून येत आहे काही इच्छुक उमेदवार तर असे आहेत की आपल्याला कोणत्या पक्षाचे तिकीट घ्यायचे अधिकृतपणे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे सुद्धा निश्चित झालेले नसतानाही फक्त मला आमदार व्हायचे एवढेच लक्षात ठेवून आपला संपर्क करत असल्याचे दिसून येत आहे जनता मात्र यामुळे कमालीची संभ्रमात दिसत आहे काही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सुद्धा संभ्रमातच आहे कारण अनेक इच्छुक उमेदवार आणि या पक्षाकडून उमेदवारी घेणार आणि त्या पक्षाकडून उमेदवारी घेणार असे सांगत आहे मात्र अनेकांचा अजून त्या त्या पक्षात प्रवेश झाल्याचे दिसत नाही वेळेवर येणाऱ्या लोकांना पक्ष अधिकृत तिकीट देणार का किंवा ज्यांनी आयुष्य आपले विविध पक्षात घातले त्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारावर वारंवार अन्याय होणार का? वेळेवर येणाऱ्या लोकांना जर अधिकृत तिकीट दिले तर निष्ठावंत लोकांवर नक्कीच अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नाराजीचा सूर सुद्धा निघू शकतो एकंदरीत विचार केला तर आज रोजी मेहकर मतदार संघात इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे मात्र काहीही असले तरी मेहकर मतदार संघातील जनता अतिशय हुशार असून अनेक इच्छुकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याची चर्चा आहे
