सिंदखेड राजा(रामदास कहाळे)
तालुक्यातील वर्दडी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय मुलीवर शिक्षकांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद आहे त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही त्यासाठी पोलीस विभागाने कठोर कारवाई कली असून आरोपीला अटक केली आहे मात्र असे असताना काही तथाकथित राजकीय पुढारी या घटनेचे भांडवल करण्यासाठी दिनांक 26 ला सिंदखेडराजा येथे मोर्चा काढत आहे वास्तविक सर्व तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याने केवळ राजकीय फायद्यासाठी काढणाऱ्या या मोर्चामध्ये पीडित वर्दडी खुर्द गावकऱ्यांचा या मोर्चाला विरोध असून या मोर्चात कोणीही गावकरी सामील होणार नसल्याचे एडवोकेट प्रदीप सोनकांबळे यांच्यासह गावकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे
वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींवर खुशाल उगले या नराधाम शिक्षकाने लैंगिक त्याच्यावर केले. यासंदर्भात किनगाव राजा पोलीस स्टेशनला सदर शिक्षकाविरुद्ध विविध व कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र या प्रकरणाला राजकीय पुढारी निशेध मोर्चा काढून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत असून त्यांनी या प्रकरणाला वेगले वळन देऊ नये. राजकीय पुढाऱ्यांनी फक्त वरदडी वाशी यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन एडवोकेट प्रदीप सोनकांबळे यांनी केले आहे
