माऊली इंग्लिश स्कूल येथे दहीहंडी उत्सव साजरा.

मंठा (डॉ आशिष तिवारी) माऊली इंग्लिश स्कूल मंठा येथे दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला कृष्ण जन्माष्टमी चा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये मुलींनी कृष्णाचा पाळणा म्हणून कृष्ण जन्म साजरा केला. सर्व मुलं ही राधाकृष्ण वेशभूषे मध्ये आली होती. तर काही मुले दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा टीम ह्या गोविंदा वेशभूषेमध्ये आले होते. मुलांनी कृष्ण जन्माचे महत्त्व सांगितले तसेच काही मुलांनी कृष्णाची गाणी, गवळणी, गायील्या, तसेच काही गोपिकांनी कृष्णा समोर रासलीला खेळली, दहीहंडीत विशेष वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य सादर केले. शेवटी गोविंदा टीमने गोविंदा आला रे आला या जोरदार गाण्यावर डान्स केला. व शेवटी मुलांचा मनोरा तयार करून छोट्या बाळ कृष्णाच्या हाताने दहीहंडी फोडण्यात आली. शेवटी गोपाळकालाचा प्रसाद सर्व मुलांना तसेच सर्व शिक्षकांना देण्यात आला. अशाप्रकारे अतिशय आनंदमय वातावरणात हा दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीशराव निर्वळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शाळेचे इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मेहनत घेतली व सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!