मेहकर (उध्दव फंगाळ)
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे या धामधुमीत मेहकर मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाला सोडावी यासाठी मेहकर मतदार संघातील काँग्रेसचे नेते मंडळी पदाधिकारी एक एकवटले आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत तीनही पक्ष आपापल्या परीने आपापल्या पक्षाकडे मेहकरच्या जागेसाठी मागणी करत आहेत ही मागणी करत असताना ज्या पक्षाला मेहकरची जागा सुटेल त्या पक्षाचे किंवा त्या उमेदवाराचे आघाडीचा धर्म पाळून आम्ही कामे करू असा सूर वरच्यावर जरी निघत असला तरी आतून मात्र सावळा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 29 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये मेहकरची जागा काँग्रेसला सुटावी यावर नक्कीच भर देण्यात आला मात्र या व्यतिरिक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्ह्यात पाहिजे तसे संघटन मजबूत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर मेहकरची जागा गेली तर केवळ आघाडी धर्म म्हणून काम करू असा दबक्या आवाजात या पत्रकार परिषदेमध्ये सूर निघाल्याचे दिसून आले उत्साह मात्र बिलकुल दिसला नाही पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता बाळासाहेब आंबेडकर यांनी आघाडी सोबत किंवा काँग्रेस सोबत यावे असा सूर निघत असताना बाळासाहेब आंबेडकर मुळे काँग्रेसला फटका बसत असल्याचे सुद्धा दिसून आले मेहकर मतदार संघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सतत तीन पंचवार्षिक मध्ये अपयश आले तरीसुद्धा यावेळेसही मेहकरची जागा काँग्रेस पक्षाला सुटावी असा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे तीनही पंचवार्षिक मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना 50 ते 55 च्या आसपास मतदान मिळालेले आहे मग यावर्षी असा कोणता चमत्कार होणार आहे की काँग्रेसच्या मतदानामध्ये वाढ होईल हा आत्मचिंतन करण्यासारखा विषय आहे मात्र काहीही असले तरी आजच्या पत्रकार परिषदेवरून उलट सुलट चर्चेला नक्कीच उधान आले आहे विधानसभा निवडणुका सुरू होत आहेत त्या दृष्टीने मेहकरची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी वरिष्ठांकडे युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे मात्र आजच्या पत्रकार परिषदेवर असे लक्षात आले की जर आघाडीत काँग्रेस पक्षाला मेहकरची जागा सुटली तर मेहकरचे पदाधिकारी व काही नेते काँग्रेसचे काम करू शकतात मात्र हीच जागा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली तर काँग्रेस कडून इमानदारीने व पाहिजे त्या प्रमाणात काम करतील असे तरी दिसून येत नसल्याचे सध्या तरी चित्र आहे कारण आज जी पत्रकार परिषद झाली यामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्यासह चार इच्छुक उमेदवार एडवोकेट अनंतराव वानखेडे लक्ष्मण दादा घुमरे साहेबराव पाटोळे अलकाताई खंडारे याचबरोबर काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते श्याम उमाळकर यांनी काँग्रेसची बाजू मांडत असताना मेहकरची जागा काँग्रेसला सुटावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व आम्ही काँग्रेसची जागा मेहकरला सोडून घेऊ असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला मात्र हे बोलत असताना श्याम उमाळकर म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यात पाहिजे तसे संघटन मजबूत नाही त्यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक असे कोणतेही लोकप्रतिनिधी नाहीत शिवाय शहर व ग्रामीण भागात सुद्धा संघटन नाही त्यामुळे याचा अर्थ असा निर्माण होतो की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेहकरची जागा गेली तर काँग्रेसवाले किती इमानदारीने काम करतील याबाबत मात्र उलट सुलट चर्चा आहेत
लक्ष्मण दादा घुमरे यांनी सांगितले की या वेळेस जर काँग्रेसला जागा सुटली तर काँग्रेसचा उमेदवार नक्की विजयी होईल असे लक्ष्मण दादा घुमरे यांनी सांगितले मात्र हे सांगत असताना बाळासाहेब आंबेडकर संदर्भात प्रश्न विचारला असता बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत किंवा महाआघाडी सोबत यावे ते आल्यामुळे आघाडीची ताकद नक्कीच वाढेल व मेहकर मतदार संघात आघाडीचाच उमेदवार विजयी होईल याचा अर्थ असा आहे की बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग मेहकर मतदार संघात नक्कीच आहे काहीही असले तरी आजची पत्रकार परिषद नेमकी काँग्रेसला मेहकरची जागा सोडा यासाठी होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जागा सोडू नका यासाठी होती असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र काहीही असले तरी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षामध्ये मेहकर मतदार संघात आतल्या गोटामध्ये काहीतरी गोड बंगाल असल्याच दिसून येत आहे जर काँग्रेसला मेहकरची जागा सुटली तर फिर वही दिल लाया हु ,,,,,,,,,, व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर ही जागा गेली तर नया है यह ,,,,,,,,,,असे म्हणण्याची वेळ नक्कीच येईल तूर्त एवढेच