डॉ. ऋतुजा ताई यांच्यामुळे धाकधूक वाढली मात्र कोणाची? कोणाच्या उमेदवारीने डॉ. ऋतुजाताई यांच होणार चांगभलं! महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव जागा व उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई आघाडी धर्म केवळ नावापुरताच पाळला जाण्याची शक्यता ?

मेहकर (उध्दव फंगाळ)
मेहकर विधानसभा मतदार संघाकडे यावेळेस संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे त्याचे कारण असे आहे की लोकसभेत महाविकास आघाडीची मेहकर मतदार संघात टक्केवारी वाढली मेहकर मतदार संघ काँग्रेसला सुटावा यासाठी काँग्रेसकडून एकजूट मात्र हे करत असताना आपल्याच आघाडीत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबद्दल काँग्रेसकडून आतल्या गोटातून नाराजीचा सूर महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव मेहकरची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई जर मेहकरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली नाही व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली तर केवळ आघाडी धर्मच पाळला जाण्याची शक्यता मात्र डॉ. ऋतुजाताई यांचे नाव मेहकर मतदार संघात अचानकपणे समोर आल्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीची धाकधूक वाढल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे जर मेहकर मतदार संघ काँग्रेसला सुटला व त्या उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली तर डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांचे चांगभलं होण्याची दाट शक्यता जाणवत असल्याचे बोलल्या जात आहे चित्र असे आहे की कोणत्याही निवडणुकीत मेहकर मतदार संघातील जनता जनार्दन बोलून दाखवतच नाही त्यामुळे शेवटपर्यंत कोणता उमेदवार विजयी होईल हे सांगता येत नाही मात्र अगोदरच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीपेक्षा आत्ताची म्हणजे 2024 ची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची होणार आहे त्याचे कारण असे आहे लोकसभेत आघाडीची वाढलेली मतदानाची टक्केवारी मात्र ही टक्केवारी वाढत असताना महायुतीच्या उमेदवारावर नाराजी होती म्हणून महाविकास आघाडीची टक्केवारी वाढली असे महाविकास आघाडीत बोलल्या जात आहे मग प्रश्न असा उपस्थित होतो की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीवर मतदार राजा जर नाराज आहे तर हे मतदान कोणाला मिळणार वाढलेले मतदान महायुतीकडेच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार का किंवा वाढलेले मतदान आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ऋतुजा चव्हाण यशस्वी होणार का? ऋतुजा चव्हाण ह्या रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात काम करत आहेत मात्र लोकसभेचे चित्र वेगळ्या स्वरूपाचे होते त्यामुळे रविकांत तुपकर किंवा महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार यांना मिळालेले मतदान विधानसभेतही कायम राहील हे मात्र सांगता येत नाही जनतेच्या मनात नेमके काय आहे हे सध्या कठीण असले तरी यावेळेस मेहकर मतदार संघाचे चित्र काही अलग राहणार असून महाविकास आघाडी यांच्यामध्ये आतल्या गोटातून नाराजी असल्याचे बोलल्या जात आहे या नाराजीचा फायदा कोणाला होणार हे सध्या सांगणे तरी कठीण आहे कारण राजकारण सतत बदलत असते त्यामुळे ऋतुजा चव्हाण यांचा सध्या चाललेला प्रचार भेटीगाठी या दरम्यान त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे मात्र हा प्रतिसाद शेवटपर्यंत ऋतुजा चव्हाण टिकून ठेवतात का हे पाहणे गरजेचे आहे काहीही असले तरी सध्या मेहकर मतदार संघात सर्वच उमेदवाराच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे यासाठी काही अंतर्गत हेवेदावे नाराजी राजकीय डावपेच अशी अनेक कारणे आहेत मात्र काहीही असले तरी महायुतीकडे एकमेव उमेदवार विद्यमान आमदार आहेत तर ऋतुजा चव्हाण ह्या कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविणार हे सध्या जरी नक्की नसले तरी सुद्धा त्या रविकांत तुपकर यांच्या संघटनेच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसमध्ये मेहकर च्या जागेसाठी आतल्या गोटातून नाराजीचा सूर दिसत असून या नाराजीच्या सुराचा निवडणुकीत कितपत परिणाम होतो हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे मेहकर मतदार संघात काँग्रेसचा मोठा मतदार वर्ग आहे काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येतील असे काँग्रेसचे नेते मंडळी सांगत आहेत तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सहानुभूतीची लाट आहे काँग्रेसच्या म्हणण्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाहीत मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मानणारा कार्यकर्ता किंवा मतदार वर्ग मात्र नक्कीच आहे शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे मताची विभाजणी नक्की होणार हे जरी निश्चित असले तरी विभाजणी झालेले मतदान नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे सध्या डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्या मेहेकर विधानसभा निवडणुकीत कुठपर्यंत आपली हिम्मत मारतात रविकांत तुपकर मेहकर मतदार संघात काही चमत्कार घडवतात का विद्यमान आमदार महायुतीचा झेंडा मेहकर विधानसभेवर कायम ठेवतात का व महाविकास आघाडी कडून मेहकर मतदार संघात परिवर्तन होणार का अशा उलट सुलट चर्चा सध्यातरी मेहकर मतदार संघात ऐकायला मिळत आहे हळूहळू जसे निवडणुका जवळ येत आहेत तसे अनेक तर्क वितर्क,राजकीय डावपेच अटीतटीची लढाई नाराजीचा सूर असे प्रकार समोर येत आहेत मात्र काही असले तरी जनता जनार्दनांना दररोज नवीन नवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत एवढे मात्र खरे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!