परतूर ( कैलास चव्हाण )
येथील आंतरराष्ट्रीय धार्मिक संस्था इस्कॉन परतुर शाखेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील वरद विनायक मंगल कार्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी आयोजन केले आहे दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शहरातील नागरिकांनी व भक्तमंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे या सोहळ्यात प्रवचनकार
मुंबई विमानतळाचे सहाय्यक मुख्य व्यवस्थापक श्री दामोदर सखा दास यांचे धार्मिक प्रवचन होणार आहे.
कार्यक्रमाच्या रूपरेषेत
• नगर संकिर्तन- दुपारी ०२.०० ते ०४.००, प्रवचण संध्या. ०६.३० ते ०७.३०
• अभिषेक: सायं. ०४.३० ते ०५:३०, महाआरती, संध्या. ०७.३० वाजता, •सांस्कृतिक कार्यक्रम-सायं. ०५:३० ते ०६:३०, व शेवटी महाप्रसाद
रात्री ०८.०० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला परतूर शहर व परिसरातील भक्तांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परतुर येथील इस्कॉन भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
परतुर इस्कॉन च्या वतीने
प्रत्येक गुरुवार सत्संग व महाप्रसाद: वेळ संध्याकाळी 06:30 ते 08:30 वाजता श्रीकृष्णा हॉस्पिटल (डॉ. संदीप चव्हाण), यांचा तळमजला, परतूर येथे होणार आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे इस्कॉनच्या संयोजकांनी आवाहन केले आहे.
