मेहकर मतदार संघात वाढत आहे इच्छुकांची गर्दी मात्र वेळेवर होणार अनेक राजकीय डावपेच निवडणुकीला येणार रंगत कोणी पाडण्यासाठी राहणार उभे तर कोणी जिंकण्यासाठी करणार जिवाचे रान

मेहकर (उध्दव फंगाळ)
मेहकर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढत आहे काही उमेदवार राजकीय पक्षाकडून इच्छुक आहेत तर काही उमेदवार स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारी दिसत आहे मात्र काहीही असले तरी ऐन वेळेवर अनेक राजकीय डावपेच खेळल्या जाण्याची दाट शक्यता आहे यावर्षी मागील इतर निवडणुकीपेक्षा 2024 च्या निवडणुकीला चांगलाच रंग येण्याचे चिन्ह दिसत आहे कोणी उमेदवार दुसऱ्याला पाडण्यासाठी उभे राहणार तर कोणी जिंकण्यासाठी जीवाचे रान करणार असे चित्र तरी दिसत आहे मात्र काही असले तरी मेहकर विधानसभेची निवडणूक हळूहळू चांगलीच रंगात येत असून निवडणुकीचे वातावरण पाहता अनेक इच्छुकांची मानसिकता बदलत असून मेहकर विधानसभेतच निवडणूक लढवायची असे ठरवून अनेक उमेदवार हालचाली करत असून जनतेच्या संपर्कात राहत आहे विधानसभेच्या निवडणुका लवकरच सुरू होत आहेत त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने हालचाली सुरू केले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे व मेहकर विधानसभा मतदार संघात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत तर दुसरीकडे यावेळेस महाविकास आघाडीचाच आमदार मेहकर मतदार संघात झाला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे तर दुसरीकडे तिसरी आघाडी व बहुजन वंचित आघाडी यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत तर ईतर अनेक अपक्ष किंवा स्वतंत्र निवडणूक लढविण्यासाठी सुद्धा लंगोट बांधून मैदानात उतरत असल्याचे चित्र दिसत आहे एकंदरीत मेहकर मतदार संघाचा विचार केला असता विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली व राजकीय कौशल्यामुळे मेहकर मतदार संघावर शिवसेनेचे म्हणजेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे कारण प्रतापराव जाधव ऐन वेळेवर काय घडामोडी घडवून आणतात काय राजकीय डावपेच खेळतात हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच राजकीय लोकांना व मतदारांना सुद्धा माहिती आहे मात्र प्रतापराव जाधव यांना अगदी तळागाळातील मानणारा मोठा मतदार वर्ग आहे तर दुसरीकडे लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेले भरघोस यश यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या आहेत त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे मात्र महायुतीमध्ये मेहकरची जागा शिवसेना शिंदे गटाकडेच असेल असे चित्र आज रोजी तरी नक्कीच आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे काँग्रेस पक्ष मेहकरची जागा आपल्याकडेच कायम ठेवावी यासाठी जीवाचे रान करत आहेत तर सहानुभूतीची लाट आहे असे समजून ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडावी अशी सुद्धा मागणी जोर धरत आहे मात्र काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही आतल्या गोटातून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असून इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे तर नेहमीच निवडणुकीत किंगमेकर राहणारे वंचित बहुजन आघाडी कडूनही काही उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत तर लोकसभेत आपला चमत्कार दाखवणारे रविकांत तुपकर यांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग मेहकर मतदार संघात आहेत त्यामुळे रविकांत तुपकर कोणाच्या नावाला हिरवी झेंडी देतात हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे काहीही असले तरी पावसाळ्याच्या दिवसातही मेहकर मतदार संघाचे वातावरण गरम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
मेहकर मतदार संघात काही उमेदवार हे जनहितासाठी निवडून येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात निवडणुका नसल्या तरी जनतेच्या संपर्कात राहत असतात तर काही उमेदवार हे दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यासाठी निवडणुकीत उभे राहतात असे अनेक निवडणुकीमध्ये चित्र पाहायला मिळत आहे निवडणुका संपल्या की हरलेले काही (अपवाद वगळून) इतर उमेदवार पाच वर्षे कुठे गायब राहतात हेच कोणाला समजत नाही मात्र काही अपयश आलेले उमेदवार मात्र जनतेच्या संपर्कात नेहमी राहतात काहीही असले तरी मेहकर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढत आहे एवढे मात्र नक्की

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!