मेहकर (उध्दव फंगाळ)
मेहकर विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा आमदार होऊन चौकार मारण्यासाठी विद्यमान आमदार सज्ज झाले असून हा चौकार रोखण्यासाठी विरोधक उमेदवारांनी सुद्धा कंबर कसल्याचे दिसून येत आहे निवडणुकीच्या या खेळात नवीन उमेदवार खाते उघडणार का जवळपास सर्वच उमेदवारांनी मेहकर मतदार संघात विजयी होण्यासाठी चांगला सराव केल्याचे दिसून येत आहे मात्र काहीही असले तरी थर्ड अंपायरची भूमिका निर्णायक ठरणार असून मेहकर मतदार संघात कोणत्या उमेदवाराला विजयी करायचे कोणत्या उमेदवाराचे मतदान खायचे कोणत्या उमेदवाराला पाडायचे यासाठी कोणता पक्ष किंगमेकर ठरणार याबाबत उत्सुकता वाढत आहे मेहकर विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे वातावरण गरम नसले तरी सुद्धा आतल्या गोटातून मात्र फिल्डिंग लावणे किंवा आपली बाजू मजबूत करणे युद्ध पातळीवर सुरू आहे मागील पाच वर्षात किंवा अलीकडच्या काही दिवसात झालेली अनेकांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत तर जे नवीन उमेदवार आले आहेत त्यांच्याकडूनही यावेळेस मलाच आशीर्वाद द्या असे म्हणून जनतेशी संपर्क करण्यात येत आहे काहीही असले तरी इतर मतदारसंघापेक्षा मेहकर मतदार संघाची निवडणूक चांगली चर्चेत येत असल्याचे चित्र दिसत आहे याला कारणही तसेच आहे विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची विजयाची घोडदोड कोणीही रोखू शकलेले नाही तर त्यांच्याच आशीर्वादाने विद्यमान आमदार हे सुद्धा सतत तीन पंचवार्षिक पासून आपली विजयी घोडदोड करत आहेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची घोडदौड यशस्वी झाली आहे मात्र विद्यमान आमदार यांची घोडदौड थांबणार का पुन्हा तशीच सुरू राहणार यासाठी कमालीची उत्सुकता वाढतांना दिसत आहे काहीही असले तरी विद्यमान आमदाराचा चौकार रोखण्यासाठी विरोधक नेहमीप्रमाणेच तयारी करत आहेत मग विरोधकांना नेहमीप्रमाणे येणारे अपयश पाहता यावर्षी यश येईल का? हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे
विद्यमान आमदाराने गेल्या पंधरा वर्षात मेहकर मतदारसंघात विकास केला नाही असा आरोप विरोधक इच्छुक उमेदवार करत आहेत मात्र हा आरोप करताना ऐन निवडणुकीच्या तोंडावरच आरोप कसा होतो ज्यावेळेस कामे सुरू असतात कामे मंजूर होतात काम पूर्णही होत असते मग त्यावेळेस आरोप प्रत्यारोप का होत नाहीत
मेहकर मतदारसंघाचा विकास झाला नाही मात्र जनता जनार्दनाकडून विकास झाला नाही असे आंदोलन किंवा आरोप होताना दिसत नाही याचा अर्थ मेहकर मतदारसंघात कामे झालेलीच आहेत काही कामे अर्धवट असतील काही निकृष्ट झाले असतील याबाबत दुमत नाही मात्र जो माणूस काम करतो त्या माणसाकडूनच जीवनात चुका होत असतात हे सुद्धा तेवढेच खरे आहे कोणताही लोकप्रतिनिधी विकास काम मंजूर करत करताना विकास कामाला निधी देत असतो मात्र 24 तास त्या कामावर उभा राहून काम करून घेऊ शकत नाही हे विरोधकांना सुद्धा माहिती आहे मात्र जनतेच्या किंवा राजकारणात चर्चेमध्ये राहण्यासाठी असे आरोप प्रत्यारोप होत असतात हे मायबाप जनता जनार्दनाला सुद्धा माहिती आहे निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीमध्ये सर्वजण स्वतंत्र आहेत लोकांच्या मनामध्ये घर करण्यासाठी विरोधकांना काहीतरी मुद्दे घेऊन जनतेसमोर जावेच लागेल त्यामुळे आरोप प्रत्यारोप या गोष्टी सुरूच राहणार आहेत जर 15 वर्षात विकास झाला नाही तर मग दर पंचवार्षिकला विद्यमान आमदार विजयी कसे होतात हा आत्मचिंतनाचा विषय आहे दर पंचवार्षिकला विरोधकांना अपयश का येते हा सुद्धा चिंतन करण्यासारखा प्रश्न आहे मात्र काहीही असले तरी मेहकर विधानसभेच्या निवडणुकीला रंगत येत आहे महाविकास आघाडीमध्ये मेहकरची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून जीवाचे रान करण्यात येत आहे व तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे कारण काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग मेहकर मतदार संघात आहे फक्त काँग्रेस पक्षामध्ये असलेली गटबाजी पाहता हा मतदार वर्ग विखुरल्या गेलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा नवीन जरी तयार झालेला असला तरी मतदार वर्ग मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सुद्धा आहे मात्र उद्धव बाळासाहेब गटाकडे नेतेमंडळींची कमतरता दिसून येत आहे शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे ठरलेलेच मतदार व ठरलेलेच नेते आहेत हे सर्वांनाच माहिती आहे कोणतीही निवडणूक सुरू झाली की कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराचे काम करतो हे सर्वांनाच माहिती आहे फक्त राजकारणात आपले नाव चालले पाहिजेत आपल्या पक्षात आपली किंमत राहिली पाहिजेत यासाठी औपचारिक निवडणूक किंवा आरोप प्रत्यारोप करण्यात येतात हा प्रश्न मेहकर मतदार संघातील कोणत्याच उमेदवाराला किंवा कोणत्याच मतदाराला सांगण्याची गरज नाही आजच्या परिस्थितीत राजकीय नेत्यापेक्षा मतदार राजा कमालीचा हुशार झाला आहे कोण कोणत्या पक्षासोबत इमानदार आहे कोणता नेता वेळेवर काय खेळी खेळतो किंवा आतून काय खेळी खेळतो हे सांगण्याची गरज मतदार राजाला बिलकुलही नाही मात्र या विधानसभेत किंवा मागील झालेल्या विविध विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरलेली आहे फक्त वंचित बहुजन आघाडीकडे पाहिजे तसा उमेदवार नेहमीच मिळत नसल्याने त्यांना अपयश येत आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत मात्र या तीन पक्षांमध्ये मेहकर मतदार संघात पाहिजे तसा समन्वय दिसून येत नाही जो तो आपलीच ओढाताण करत आहे दुसरीकडे महायुतीमध्ये सर्व एकनिष्ठ व एक दिलाने काम करत असल्याचे चित्र आज रोजी तरी आहे महायुतीमध्ये आमच्याच पक्षाला जागा सोडा अशी ओढाताण बिलकुलही दिसून येत नाही किंवा गटबाजी सुद्धा असल्याचे बिलकुल दिसत नाही हे बातमीतून नव्हे तर सर्वांनाच उघडपणे माहिती आहे त्यामुळे विद्यमान आमदार मेहकर मतदार संघात चौकार मारण्यासाठी सज्ज झाले असून विद्यमान आमदाराचा चौकार रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे विद्यमान आमदार चौकार मारणार का हे पाहणे गरजेचे आहे नवीन उमेदवार खाते उघडणार का? थर्ड अंपायरची भूमिका काय असणार हे येणारा काळच ठरवेल
