मेहकर (उध्दव फंगाळ)
मेहकर व लोणार तालुक्यात एक सप्टेंबर रोजी रात्री व दोन सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचे व काही गावातील गोरगरीब कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे ज्या गावांमध्ये नुकसान झाले असेल त्या गावातील तात्काळ पंचनामे करावे अशा कडक सूचना आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा पंचनामे करत असताना हलगर्जीपणा व निष्काळजीपणा न करता वस्तूनिष्ठ व ताबडतोब पंचनामे करून त्या संदर्भाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे ताबडतोब पाठवावा अशा कडक सूचना सुद्धा यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी दिल्या गेल्या दोन-तीन दिवसापासून मेहकर लोणार तालुक्यात अतिवृष्टी व काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामध्ये मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, पारखेड ,मोहना, मांडवा, वडाळी तर लोणार तालुक्यातील रायगाव ,सावरगाव मुंडे, गंधारी, नांद्रा या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे त्या ठिकाणचे घरांचे शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले असून सध्या शेतकरी व गोरगरीब लोक अडचणीत आहेत त्यामुळे तालुका कृषी अधिकारी व महसूल विभागाने ताबडतोब संबंधित गावात जाऊन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशा कडक सूचना आमदार संजय रायमुलकर यांनी यावेळी दिल्या
