केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यामुळे 64 हजार कुटुंबाला मिळणार हक्काचे घर सरपंच संघटनेने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे केली मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले ताबडतोब आदेश गोरगरिबांचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊन हक्काचे घर मिळणार

 

मेहकर (उध्दव फंगाळ)
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे ज्यांना घर नाही किंवा कच्चे व पडके घर आहे अशा कुटुंबाला सरकारकडून घरकुलाच्या माध्यमातून स्वतःचे घर उपलब्ध व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी 64 हजार घरकुल मंजूर करून घेतले आहेत मात्र हे घरकुल ग्रामीण भागात बांधकाम करत असताना ज्या कुटुंबाची जागा आहे त्या 50% जागेवर सरकार असा उल्लेख येत असल्याने घरकुल बांधकामासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या या संदर्भात 15 फेब्रुवारी रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील सरपंच संघटनेने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांची भेट घेतली गोरगरिबांची व घरकुल बांधकामाची काय अडचण येत आहे या संदर्भात सविस्तर चर्चा केली त्याचक्षणी थोडाही विलंब न लावता सरपंच मंडळी कडून घरकुला संबंधी येणाऱ्या अडचणीची माहिती घेऊन उपविभागीय अधिकारी मेहकर यांना ताबडतोब फोन करू ग्रामीण भागात जी एफ क्लास जमीन आहे ती जमीन घरकुलासाठी नियमानुसार उपलब्ध करून द्यावी व गोरगरिबांना हक्काचे घर मिळून द्यावे असे आदेश वजा सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी दिले आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 64 हजार गोरगरिबांना आता स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे सरपंच संघटनेने माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे यावेळी मेहकर आणि लोणार सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण भाऊ दळवी मोहना बु येथील शिवसेना नेते सुरेश भाऊ आडे गजानन सावंत सरपंच बरटाळा प्रमोद तांगडे कडुबा वैराळ समाधान साठे प्रभाकर देशमुख लोणार सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद सुलताने व इतर सरपंच यांनी मा प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आरोग्य यांच्या कडे मागणी केली की आमच्या प्रत्येक गावात एफ क्लास जमीन उपलब्ध असुन. ती एफ क्लास जमीन घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना नियमानुसार नियमाकुल करून देण्यात यावी यासंबंधीची मागणी सरपंच संघटनेचे पदाधिकारी मेहकर व लोणार यांनी धरुन ठेऊन आग्रहाची भूमिका बजावली असता तात्काळ मा प्रतापराव भाऊ जाधव केंद्रीय मंत्री आरोग्य भारत सरकार यांनी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना संपर्क साधुन एफ क्लास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे पाचशे स्क्वेअर फूट जागा अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना आदेश दिले आहेत

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!