देऊळगाव कुंडपाळ येथे दिवाळी झाली साजरी – संजय रायमुलकर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मुलाबाळांना सांगा संजय रायमुलकर साहेब

 

लोणार (उध्दव फंगाळ)

सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर व लोणार तालुक्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जवळपास आतापर्यंत 40 पुतळे बसविण्यात आले आहेत हे सर्व पुतळे अश्वारूढ असून मेहकर व लोणार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये युवक असो वयोवृद्ध असो महिलावर्ग असो अतिशय आनंदाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे बसवीत आहेत याच पार्श्वभूमीवर 4 मार्च रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी साहेब लोणार शिवसेना तालुकाप्रमुख भगवान सुलताने साहेब यांच्या हस्ते बसविण्यात आला यावेळी पुतळा बसविण्यासाठी देऊळगाव कुंडपाळ येथील सर्वच गावकरी आनंदात व उत्साहात दिसत होते अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध महिला पुरुष या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी संजय रायमुलकर साहेब म्हणाले की देऊळगाव कुंडपाळ या ठिकाणी आज रोजी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे या उत्सवामध्ये देऊळगाव कुंडपाळ वाशी यांनी जणू दिवाळीच साजरी केली आहे ढोल ताशे फटाके यांची आतिषबाजी करून मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला आहे आपण आत्तापर्यंत 40 पुतळे मेहकर व लोणार तालुक्यात बसविले आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह राजमाता अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा यांचे पुतळे सुद्धा बसविण्यात आल्याचे रायमुलकर साहेब यांनी सांगितले मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवत असताना आपल्या राज्याचा इतिहास आपल्या लहान मुला बाळांना सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कसा संघर्ष केला कसे मावळे जमा केले सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यामुळे आपण सुद्धा कुठेही जातीभेद भेदभाव न करता आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या जाणता राजाचा आदर्श घेऊन काम करावे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सौंदर्य करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही रायमुलकर साहेब यांनी सांगितले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!