शेतकरी भवन लोकार्पण सोहळ्यात संपादक उद्धव फंगाळ यांचा गौरव.. केंद्रीय मंत्री ना. जाधव, कामगार मंत्री फुंडकर, माजी आ. रायमुलकर यांची उपस्थिती

 

मेहकर( कैलास राऊत)

निर्भीड पत्रकारिता म्हणजे धाडसाने आणि निष्पक्षपणे सत्य मांडणे ज्यामुळे समाजाला न्याय मिळतो. निर्भीड पत्रकाराचा सत्कार म्हणजे त्यांच्या या योगदानाला गौरवणे जेणेकरून ते अधिक निर्भीडपणे पत्रकारिता करत राहतील याच पार्श्वभूमीवर 20 एप्रिल 2025 रोजी मेहकरच्या वैभवात भर पाडणाऱ्या शेतकरी भवन या भव्य दिव्य सोहळ्याच्या लोकार्पण प्रसंगी दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्हचेचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांचा करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ,कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर, माजी आ. डॉ.संजय रायमुलकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव, युवा नेते नीरज भाऊ रायमुलकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.आज समाजामध्ये
निर्भीड पत्रकारितेचे खुप महत्त्व असुन
सत्य आणि न्याय या ब्रीद वाक्यानुसार
निर्भीड पत्रकारिता समाजाला सत्य माहिती देते आणि अन्याय, भ्रष्टाचार उघड करते.
निर्भीड पत्रकारिता लोकशाहीला मजबूत करते, कारण ती नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार देते निर्भीड पत्रकारिता समाजात विविध समस्या आणि मुद्द्यांवर जागरूकता वाढवते, ज्यामुळे लोक एकत्र येऊन समस्यांवर उपाय शोधू शकतात.
निर्भीड पत्रकारिता लोकशाहीचे एक महत्त्वाचे स्तंभ आहे जी समाजाला योग्य दिशा दर्शवते आणि लोकांमध्ये न्याय मिळवण्याची भावना जागृत करते या सर्व बाबीसाठी दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्हचे संपादक उद्धव फंगाळ सातत्याने सजग प्रहारी म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम एकनिष्ठतेने करतात ते आज नसून मागील 30 वर्षापासून सातत्याने लेखणीची धुरा सक्षमपनाने आपल्या खांद्यावर सांभाळत आहे. सत्कार हा
पत्रकारांना प्रोत्साहन देतो, त्यांच्या लेखणीला बळ देण्यासोबतच त्यांच्या कामाला अधिक महत्त्व प्राप्त करून देतात उद्धव फंगाळ समाजाला सत्य माहिती देतात आणि समाजासाठी लढतात. संपादक उद्धव फंगाळ निश्चित सातत्याने आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मेहकर शहर व तालुक्यातील प्रत्येक घटनेची अपडेट तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वाचकांचा सातत्याने कुठल्याही प्रकारच्या जाहिरातीच्या पाठलाग न करता समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ते वाचकापर्यंत पोहोचवतात सतत आपल्या पत्रकारितेशी इमान राखत वस्तुनिष्ठ बातम्या देण्यासाठी उद्धव फंगाळ ” सिर्फ नाम ही काफी है! “असे म्हटल्यास वावगे ठरू नये
या कार्यक्रमाला मेहकर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव फंगाळ यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी केले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!