मेहकर(उध्दव फंगाळ)
-मागील गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या पेनटाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्णायक निकाल लागला असून, मौजे पेनटाकळी गावातील ४०१ नागरिकांना हक्काचे प्लॉट चे वितरण केंद्रीय मंत्री ना.प्रतापरावजी जाधव साहेब व मा.आ.संजयजी रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
-केंद्रीय मंत्री ना.प्रतापरावजी जाधव साहेब व मा.आ.संजयजी रायमुलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश येऊन गावकऱ्यांच्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीत मोलाची भर पडली आहे.
-१९९८ पासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रश्नासाठी गावकऱ्यांनी बारा दिवस प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्दवाढीसाठी उपोषण केले होते.केंद्रीय मंत्री ना.प्रतापरावजी जाधव साहेब व मा.आ.संजयजी रायमुलकर यांनी मागील अनेक वर्षे पासून लक्ष घालून प्रशासकीय पातळीवर व मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा केला.
-शासनाच्या मान्यतेनंतर ७ हेक्टर ८२ आर जागेवर एकूण ४०१ भूखंड तयार करण्यात आले. नियोजित आराखड्यानुसार समाजनिहाय या प्लॉट्सचे वाटप गावकऱ्यांना करण्यात आले असून, केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव यांनी स्वतः गावात जाऊन लाभार्थ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला व समस्या दूर केल्या आहेत.
या कार्यक्रमाला तहसीलदार निलेश मडके,सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एम.जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे, मंडळ अधिकारी गजानन ढोके,तलाठी सागर जायगुडे,ग्रा.पं.अधिकारीडी.बी.काळे,मोहन मगर, गजानन लहाने,जी.पी.मवाळ,संरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी,शिवसेनेचे पंजाबराव इंगळे,पुंजाजी इंगळे,भुंजगराव इंगळे,संतोष डुकरे,अमोल म्हस्के,सरपंच ,ग्रामस्थ,प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
