मेहकर (उध्दव फंगाळ)
मेहकर येथील सुप्रसिद्ध विधीतज्ञ मा.अॕड.व्हि.डी.नरवाडे पाटील साहेब यांची नगरपरिषद येथील विधी व न्याय विभागाच्या सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
मेहकर नगर परिषदेच्या विधी व न्याय विभागाच्या सल्लागार पदी निवड झाल्या मुळे निश्चितच मेहकर शहरातील सर्व नागरिकांना कायदेशीर रित्या सल्ला व न्याय मिळेल व नगरपालिकेच्या सुद्धा न्याय व विधी विभागाच्या अडचणी दूर होतील.अतिशय पारदर्शक व कायदेशीरपणे कारभार चालेल. ॲड.विनोद नरवाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहरांमध्ये सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे तर यावेळी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रामराजे कापरे साहेब यांनी अँड.विनोद नरवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सुद्धा अँड .विनोद नरवाडे साहेब यांचे स्वागत केले यावेळी सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी भाजपचे अँड .राजेश निकम यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते अँड .विनोद नरवडे हे मेहकर येथील दिवाणी न्यायालय मध्ये वकील व्यवसाय करतात मात्र वकील व्यवसाय करत असताना न्यायालयात अँड .नरवाडे साहेब यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटवलीला आहे कायद्याचे तंतोतंत पालन करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न एडवोकेट विनोद नरवाडे यांनी आपल्या वकील व्यवसायामधून केलेला आहे व सतत सुरू आहे वकील व्यवसाय बरोबर एडवोकेट विनोद नरवाडे यांचा सामाजिक व राजकीय कार्यातही मोठा सहभाग आहे मित्रांचा गोतावळा त्यांचा फार मोठा आहे जात धर्म पंथ न पाहता आलेल्या व्यक्तीचे शंभर टक्के काम करून देणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून एडवोकेट विनोद नरवाडे यांचे व्यवसाय बरोबर समाजकार्य सुद्धा नेहमीच सुरू असते त्यांच्या कामाची दखल म्हणून त्यांची नगरपालिकेमध्ये विधी व न्याय विभागाच्या सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे व याचा जास्तीत जास्त फायदा हा मेहकर वासियांना भविष्यामध्ये नक्कीच होईल
