बीड -(सखाराम पोहीकर)
शहरातील आसेफ़नगर भागाचा मुख्य रस्ता व नाल्याचे बांधकाम सुरू होऊन एक वर्ष पुर्ण झाले. तरी काम पूर्णत्वास गेले नसल्याने येथील रहिवाशांनी केक कापून या बांधकामाचा वाढदिवस साजरा करत गांधीगिरी आंदोलन केले.
माहिती अधिकार संघटनेचे बीड तालुकाध्यक्ष शेख मुबीन दादा भंगारवाले यांच्या नेतृत्वाखाली सदरील गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, पुढच्या डिसेंबर पर्यंत जर येथील रस्त्याचे व नाल्याचे काम पूर्ण झाले नाही तर येथील बांधकामाचे दुसरे वाढदिवस पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये पुन्हा साजरे करण्यात येईल. यावेळी शेख वासेख, शेख वसीफ़, अब्दुल जब्बार खान पठाण, शेख मुहम्मद अब्दुल हमीद, ज्येष्ठ नागरिक समशेर खान पठाण, मदनी फारुकी, शेख शरीफ, शेख मुहम्मद अर्शियान, मुहम्मद अब्दुल क़दीर यांची प्रमुख उपस्थिती होती.