मेहकर (उध्दव फंगाळ)
उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्ट्या लागल्या की विद्यार्थ्यांचा कल हा कॉम्प्युटर कोर्सकडे वळतो.अशातच आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोर्स म्हणजेच एम. एस.-सी.आय. टी., म्हणूनच विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त प्रमाणात एम. एस.-सी.आय. टी.,या कोर्सकडे आहे. कोणत्याही प्रकारची शासकीय किंवा खाजगी नोकरीकरिता एम. एस.-सी.आय. टी.,चे प्रमाणपत्र लागते.दिशा आय टी पार्क मेहकर येथे भरपूर अशा प्रमाणात प्रवेश झाले होते. जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार समारंभ दिशा आय टी पार्क येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रुद्र कोचिंग क्लासेस चे संचालक श्री विशाल चांगाडे सर तसेच शितल अकॅडमि इंग्लिश स्पिकिंग चे श्री रोहीत चव्हाण सर व माध्यमिक विद्यालय मेहकर शाळेचे शिक्षक श्री सुचित जाधव सर उपस्थित होते. ऋतुजा जाधव या विद्यार्थीनीने 100 पैकी 99 गुण प्रथम क्रमांक मिळविला, तसेच निकिता आव्हाळे व माया बनसोडे विद्यार्थिनींनी 97 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला ,व रिद्धी वाघ, शुभम आव्हाळे, गायत्री इंगळे, धीरज दाभाडे प्रत्येकी 95 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच हर्षदा जाधव 93 गुण,मयूर वानखेडे 93 गुण,जयश्री वानखेडे 91 गुण, यश वाघ 91 गुण, आरती देशमुख 90 गुण, कृष्णा धोंडगे 90 गुण,तसेच संस्थेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.कॉम्प्युटर सेंटर चे प्रा. विनोद आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व तसेच नवीन बॅच करिता प्रवेश सुरु असल्याचे सांगितले.प्रवेशासाठी संपर्क :दिशा आय टी पार्क लाहोटी कॉम्प्लेक्स, गाभणे हॉस्पिटल समोर, मेहकर, मो. नं.9511406555.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयश्री वानखेडे व तन्वी उगले या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन दीपक ठाकरे या विद्यार्थ्याने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी पार पाडण्याकरिता सौ. आव्हाळे मॅडम, दिपक ठाकरे स्वप्नील अवसरमोल, सुमेध डोंगरदिवे, ख़ुशी पाटील, सनोबर शहा, अभिषेक हाडे इ. विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.