चोपडा (हेमकांत गायकवाड )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चोपडा आगार व डाॅ.रोहन महेंद्र पाटील मित्र परिवार आणि युवासेना चोपडा तर्फे आज दिनांक २७ डिसेंबर रोजी कर्मचार्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन, शिबीरात ब्लड प्रेशर,ब्लड शुगर,ब्लड गृप,तसेच इतर तपासण्या करण्यात येणार आहेत.तरी चोपडा आगारातील सर्व सहकाऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील डॉ रोहन पाटील यांनी केले आहे.