कोरोना पुन्हा डोकंवर काढतोय,आरोग्य विभाग तयारीत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाने घेतली रंगीत तालीम ऑक्सिजन सिलेंडर सहित कॉन्सन्टरेटर दुरुस्ती देखभाल दुरुस्ती करण्याचे आदेश

मेहकर (उध्दव फंगाळ)*

 

मागील काही दिवसा पासून कोरोनाचे रुग्ण देशात वाढत आहे यावर राज्यातील आरोग्य विभागाने सर्व शासकीय यत्रेनाला अलर्ट जाहीर केला असून त्याला पाहता बुलढाणा जिल्हात 17 डिसेंबर रोजी रंगीत तालीम घेण्यात आली असून प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सहित ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची रॅपिड व आर्टिफिशियल टेस्ट घेण्याच्या सूचना दिल्या तसेच कोरोनाच्या अनुषंगाने ऑक्सिजन सिलेंडर सोबतच कॉन्सन्टेटर दुरुस्ती देखभाल करून रेडी ठेवण्या संबंधी सूचना देण्यात आल्या त्या सोबतच जिल्हा भरात सर्दी, पडसे ताप या सारखे लक्षण असणाऱ्यांना कोरोना टेस्ट घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

देशात कोरोना रुग्ण वाढत आहेत त्याला पाहता बुलढाणा जिल्हातील आरोग्य विभागाने 17 डिसेंबर रोजी रंगीत तालीम घेतली ज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागणारी सर्व यत्रणा तपासून पाहण्यात आली सध्या बुलढाणा जिल्हात प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणारे उपकेंद्रा मध्ये रॅपिड टेस्ट घेण्यात येणार आहे त्याला पाहता प्रत्येक तालुक्याला 1 हजार रॅपिड टेस्ट किट देण्यात आल्या व सोबतच कोरोना आर्टीपीसीआर टेस्ट घेण्यात येणार ज्यात सर्दी, खोकला, ताप या सारखे लक्षण असणाऱ्यांनची टेस्ट घेतली जाणार आहे जर टेस्ट मध्ये कोणी पॉजिटीव्ह आले तर त्याची पुणे येथील लॅब मध्ये नमुने पाठवून व्हायरस स्ट्रेथ तपासून पहिल्या जाणार आहेत ज्यातून कोरोनाचा प्रकार कळणार आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने कोरोनाशी लढण्याची तयारी केली असून कोरोनाशी लढाई मध्ये मुख्य भूमिका ही ऑक्सिजन निभावत असल्याने बुलढाणा जिल्हातील जिल्हा आरोग्य केंद्र, उपजिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असलेले ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन प्लॅन्ट, व्हेंटिलेटर हे रेडी करून ठेवण्यात आले.

बुलढाणा जिल्हात 167 व्हेंटिलेटर, मोठे ऑक्सिजन डुरा सिलेंडर 45, ऑक्सिजन बी टाईप सिलेंडर 579, ऑक्सिजन डी टाईप सिलेंडर 2 हजार 352 सिलेंडर सोबतच 9 ऑक्सिजन प्लॅन्ट,212 कॉन्सनटटेटर असून ते सर्व तपासणी करून रेडी करून ठेवण्यात आलेले आहे.

देशात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता 23 डिसेंबर पासून कोरोना टेस्ट घेण्यात सुरवात करण्यात आली ज्यात आरटीपीसीआर टेस्ट 4, रॅपिड टेस्ट 132 करण्यात आल्या ज्यात कोणीही पॉजिटीव्ह मिळून आलेले नसून जनतेने सावधगिरी बाळगून हात धुणे, सॅनिटाईजर वापरणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व जायचे काम पडल्यास मास्क वापरणे ही काळजी घेणे गरजेचे आहे आरोग्य विभाग कोरोनाशी लढण्या साठी तयार असून त्याची पूर्ण तयारी सुद्धा झालेली आहे – डॉ प्रशांत प्रकाशराव तांगडे जिल्हा साथ रोग अधिकारी बुलढाणा जिल्हा.

 

 

( कोरोना संबंधी आरोग्य विभागाची तयारी पाहता जनते मध्ये विविध चर्चाना उधाण आलेले आहे मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याच दरम्यान कोरोना संबंधी आरोग्य विभागाची तयारी म्हणजे कोरोनाच्या बहाण्याने मराठा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी चर्चा सुद्धा जण सामान्यात रंगलेली आहे )

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!