देऊळगाव राजा वन विभागातील कर्मचाऱ्यांचा अजब कारभार वन विभागाचा मनमानी कारभार – पांगरी येथील शेतकऱ्यांची वन परीक्षत्र अधिकाऱ्यांकडे तक्रार

देऊळगाव राजा (किरण वाघ)
शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानल्या जातो.परंतु शेतकऱ्यांना पेरणी झाल्यापासून ते पिके काढणी पर्यंत शेतकऱ्यांना जिवाचे रान करून शेतात राबराब राबावे लागते त्यात अनेक संकटे उभे राहतात. वन्य प्राण्यांमूळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.परंतु त्यात वन्य प्राण्यामुळे पिकाची नासाडी होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुसकान भरपाई म्हणून शासन आर्थिक मदत देते.परंतु देऊळगाव राजा तालुक्यातील वन भागाच्या अधिकाऱ्यांकडून असे कृत पाहवयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे केले तर.तुटपुंजी मदत मिळते.व अधिकारी यांना असे म्हटले तर.त्याच शेतकऱ्यांना भरपुर मदत मिळते.हा प्रकार पाहून.पांगरी येथील शेतकरी.विठ्ठल पंढरीनाथ जाधव व विट्टला आचिराव वाघ यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे.तक्रारीत असे म्हटले आहे की. वन्य प्राण्यांमूळे झालेल्या नुकसानीची पाहणी न करता . कर्मचारी पंचनामे करून.अंदाजे तुटपुजी रक्कम देण्यात आली आहे.काही शेतकऱ्यांची नुसकान नसतानाही .नियम धाब्यावर बसवून भरपूर मदत देण्यात आली आहे.देऊळगाव राजा वन परीक्षत्र अधिकारी यांनी पंचनामे करण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.असे निवेदनात म्हटले आहे. तसेच देऊळगाव राजा तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना बिलकुल ही मदत देण्यात आलेली नाही मात्र काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसतानाही केवळ चिरीमिरीचा व्यवहार करून नुकसान भरपाई दाखवण्यात आली आहे व त्यांना मदत देण्यात आली आहे मात्र ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे असे शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहे काही कर्मचारी मनमानी कारभार करीत असून शेतकऱ्यांच्या भरोशावर गब्बर होत आहेत या संदर्भात गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांनी तक्रार करूनही वरिष्ठांनी कोणतीच कारवाई केल्याचे दिसून आले नाही त्यामुळे अशा गैर प्रकाराला वरिष्ठांचे अभय आहे की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित होत आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून सदर प्रकरणाची चौकशी व्हावी व ज्या कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने मदत टाकली असेल अशा कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन खऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!