मेहकर ( योगेश सौभागे) सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात व शहरांमध्ये विविध आजाराचे प्रमाण वाढत आहे खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या गोरगरिबांची संख्या वाढताना दिसत आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब रुग्ण गेले असता त्या ठिकाणी औषध साठा उपलब्ध नसल्याने गोरगरिबांच्या हाल होत आहेत लहान मुलांच्या लसही वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून लवकरात लवकर औषधांचा पुरवठा करून गोरगरिबांना चांगली रुग्णसेवा द्यावी अन्यथा यशवंत सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यशवंत सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन बोरकर यांनी दिला आहे
मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत सध्या महागाई कमालीची वाढली आहे गोरगरिबांना ग्रामीण भागात कामे नाहीत तर ग्रामीण भागात विविध आजाराचे प्रमाण वाढत आहे अशा बिकट परिस्थितीत ग्रामीण व मेहकर शहरातून अनेक गोरगरीब रुग्ण मेहेकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात मात्र या रुग्णालयांमध्ये औषधाचा कमालीचा तुटवडा आहे गोरगरीब रुग्णांना बाहेरच्या मेडिकल वरून औषधी घ्या असे सांगण्यात येत आहे या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने गोरगरिबांना महागड्या खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा लागत आहे त्यामुळे गोरगरीब रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे मेहकर तालुक्याला अनेक खेडे विभाग जोडलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण या रुग्णालयात येत असतात मात्र रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत गोरगरिबांचे हाल होत आहेत अशा परिस्थितीत नेमकी तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न गोरगरिबांना उपस्थित होत आहे मात्र वेळेवर उपचार घेण्यासाठी व ग्रामीण रुग्णालयात औषधी वेळेवर मिळत नसल्याने गरिबांना महागड्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा लागत आहे त्यामुळे या रुग्णालयात लवकरात लवकर औषध उपलब्ध करून द्यावे अन्यथा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख गजानन बोरकर यांनी दिला आहे