चोपडा (हेमकांत गायकवाड )
शिरपूर चोपडा रोडवर असलेले गलंगी गावच्या हद्दीत उंट यांची क्रुरतीने व निर्दयपणे वागणूक दिली जात आहे.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन रितेश रामकृष्ण माळी यांच्या फिर्यादिनुसार दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा च्या सुमारास चोपडा ते शिरपुर जाणारे रोडवर गलगी ता.चोपडा गावाच्या हद्यीत आरोपी सोमाभाई मेधा रबारी,रा.लियारी,ता.अबडासा,जि.भुज,राज्य गुजरात,लाखाभाई देवाभाई रबारी रा.बांड,ता.बुधरा,जि.भुज,राज्य गुजरात,वज्रभाई रबारी लालाभाई दबाय,रा.मोधारा रा.ता.हलिया,जि.भुज,राज्य गुजरात,बाधाभाई मेधाभाई रबारी रा.लिधारी,ता.नलोया,जि.भुज,राज्य गुजरात यांनी त्यांचे मालकीचे ५ ते ९ वर्षे वयोगटाचे लहान मोठे तपकिरी रंगाचे,कृच्ची जातीचे,आखूड शेपटीचे एकुण.१६,३१,०००/- रुपये किमतीचे ८५ उंट,पाना भुज,राज्य गुजरात येथुन पायी चालत घेवून येवून त्याचा छळ करत त्यांना आराम न देता त्यांना सतत छळत चालवित घेवून येवून त्यांना पुरेश अन्न पाणी न देता त्यांना अशक्त पणा येईपर्यंत क्रूरतने पायी चालवित घेवून आले आहेत म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे.सी सी.टि.एन.गुरनं २९६/२०२३ प्राण्यांच्या छेड प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१ h डी)महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ.राजू महाजन हे करीत आहे.